Saturday, April 27, 2024

Latest Posts

पावसाळ्यात खा ‘हा’ चमचमित पदार्थ, बटाट्यांपासून बनवा Aloo Balls!

जून उजाडला आहे आणि लवकरच आता पावसाचे आगमन होणार आहे. पावसाळ्यात प्रत्येकालाच काहीना काही गरम खाण्याची इच्छा होते. अनेक जण गरमा गरम भजी आणि कडक चहावर ताव मारतात.

जून उजाडला आहे आणि लवकरच आता पावसाचे आगमन होणार आहे. पावसाळ्यात प्रत्येकालाच काहीना काही गरम खाण्याची इच्छा होते. अनेक जण गरमा गरम भजी आणि कडक चहावर ताव मारतात. परंतु भजी आणि चहा हे फारच जुने समीकरण झाले आहे. म्हणूनच नेहमीच्या समीकरणाला तोड देण्यासाठी आज आम्ही काही तरी वेगळी, नवीन आणि खास रेसिपी फक्त तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पावसाळ्यात प्रत्येकालाच काही ना काही गरमागरम खाण्याची इच्छा होते. मग कधी आपण मॅगी करतो तर कधी कांदा किंवा बटाट्याची भजी. परंतु तेच तेच भजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. बटाटा हा असा खाद्यपदार्थ आहे जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडतो. बटाट्यांपासून तयार झालेला तसेच नेहमीच्या भज्यांपेक्षा जरा हटके पदार्थ म्हणजे आलू बॉल्स. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण हे आलू बॉल्स बनवू शकतो. आलू बॉल्स चवीला प्रचंड चमचमीत,चविष्ट आणि कुरकुरीत असतात. चला तर मग जाणून घेऊयात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे आलू बॉल्स कसे तयार करावे.

आलू बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

उकडलेले बटाटे – २
कांदा – १
मिरची – २
कोथिंबीर – अर्धी वाटी
पुदीना – अर्धी वाटी
आलं – १ इंच
तिखट – अर्धा चमचा
जीरा पावडर – अर्धा चमचा
चाट मसाला – पाव चमचा
किचन किंग मसाला – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
ब्रेड – १० स्लाईस
तेल – १ वाटी

आलू बॉल्स बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्व प्रथम बटाटे उकडून हाताने मॅश करुन घ्यावेत नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, मिरचीचे तुकडे घालावेत. नंतर यामध्ये चाट मसाला, जीरा मसाला, तिखट, किचन किंग मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे. आता ब्रेडच्या कडा काढून मधला भाग पाण्यात थोडा ओलसर करावा. नंतर या ब्रेडच्या ओल्या स्लाईसवर बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा ठेवून ब्रेडने हा गोळा बंद करुन घ्यावा. हे बॉल्स तेलात चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यावेत आणि गरमागरम खायला घ्यावेत.

अशाप्रकारे चमचमीत आणि चविष्ट आलू बॉल्स ताव मारण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा:

तरुणांसाठी आनंदाची बातमी, पुण्यामध्ये ४०,००० नोकऱ्या होणार उपलब्ध

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss