Friday, April 26, 2024

Latest Posts

घरच्या घरी बनवा Hotel Style Chiken Momos, स्पेशल रेसिपी फक्त तुमच्यासाठी…

मोमो हा विदेशी पदार्थ भारतीयांमध्ये अगदी प्रसिद्ध आहे. तरुणाई बरोबर लहानांमध्ये सुद्धा हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो.

मोमो हा विदेशी पदार्थ भारतीयांमध्ये अगदी प्रसिद्ध आहे. तरुणाई बरोबर लहानांमध्ये सुद्धा हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो. या पदार्थाने अनेक खवय्यांना वेड लावले आहे. हा पदार्थ भाज्यांपासून तसेच चिकन पासून सुद्धा तयार केला जातो. आजकाल या वाफवलेल्या पदार्थाची अनेक व्हरायटी येत आहेत. यामध्ये विशेषतः फ्राय मोमोज ते चीज मोमोज यांचा समावेश होतो.

मोमोज हे शाकाहारी तसेच मांसाहारी या दोन्ही प्रकारात तयार केले जातात. मोमोजच्या आत भाज्यांचे सारण घातले की ते शाकाहारी झाले, त्याच प्रकारे चिकन किंवा मटण खिमा करून घातले तर ते मांसाहारी झाले. सर्वांनाच आवडणारे हे मोमोज आपण घरी देखील सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. चला तर मग आज पाहुयात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हॉटेलसारखे मांसाहारी मोमोज घरच्या घरी कसे तयार करावे.

मांसाहारी मोमोज तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

एक वाटी चिकन/ मटण खिमा
कांदा, लसून, अदरक, मिर्ची, टमाटर, कोथींबीर
मिरे, कलमी, मोठी वेलची, जायफळ, शाहजीरे याला भाजून बारीक करणे
एक वाटी कणीक
एक छोटा चमचा तेल, पाणी, मीठ

मांसाहारी मोमोज तयार करण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम पुऱ्यासारखेच तेलाचे मोहन घालून जरा घट्टसर कणिक भिजवून बाजूला ठेवावे. तसेच कांदा आणि आलं लसूण पेस्ट करून घ्यावीत त्यानंतर कांदा आलं नसून केलेली पेस्ट चिकन/ मटण खिमामध्ये परतून घट्टसर सारण बनवावे. आता कणकेचे लहान गोळे लाटून त्यात चिकन तसेच मटणाचे सारण भरून मोमोज बनवावे. त्यानंतर कुकरमध्ये शिट्टी न लावता
इडलीप्रमाणे १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे. अशा प्रकारे चविष्ट आणि हॉटेल सारखे चिकन/मटण मोमोज घरच्याघरी तयार आहेत.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss