Saturday, April 27, 2024

Latest Posts

हा चायनीज पदार्थ बनवा काही मिनिटात; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

अगदी लहानमुलांपासून मोठ्यामाणसांपर्यंत चायनीज सर्वांनाच आवडते. लहान मुलं तर चायनीज च्या अनेक पदार्थांवर ताव मारतात. हॉटेल मध्ये गेल्यावर बहुतांश लोक चायनीज खाण्यास प्राधान्य देतात

अगदी लहानमुलांपासून मोठ्यामाणसांपर्यंत चायनीज सर्वांनाच आवडते. लहान मुलं तर चायनीज च्या अनेक पदार्थांवर ताव मारतात. हॉटेल मध्ये गेल्यावर बहुतांश लोक चायनीज खाण्यास प्राधान्य देतात. भारतात चायनीज चे पदार्थ भरपूर लोकप्रिय आहेत त्यामुळे भारतातील प्रत्येक हॉटेल पासून ते लहान टपरी वर सुद्धा चायनीज चे पदार्थ उपलब्ध होतात. आपण नेहमी बाहेर जाऊन चायनीज चे पदार्थ खातो पण बाहेरचे पदार्थ आपल्या साठी हानिकारक असतात. काही वेळेस बाहेरचे पदार्थ खाऊन आपल्याला पोटाचा त्रास होतो. परंतु आपण हे चायनीज चे पदार्थ घरी देखील करू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक चायनीजचा पदार्थ त्याचे नाव म्हणजे स्प्रिंग रोल (Spring Roll). स्प्रिंग रोल यात नूडल्स (Noodals) आणि रोल्स चे एकजीव केलेले मिश्रण असते. स्प्रिंग रोल हे प्रसिद्ध स्ट्रीट फूड (Street food) आहे. आपण स्प्रिंग रोल हा अगदी कमी वेळात घरच्या घरी बनवू शकतो. चला तर मग जाणून घ्या स्प्रिंग रोल ची संपूर्ण रेसिपी.

स्प्रिंग रोल बनविण्यासाठी लागणारे साहित्य

कांदा – १ किंवा २
कोबी – १
शिमला मिरची – १ किंवा २
वाफवून घेतलेले नूडल्स – २ बाउल्स किंवा हातात बसतील तेवढे
चिली सॉस – २ चमचे
बारीक चिरलेला लसूण – २ चमचे
बारीक चिरलेले आलं – २ चमचे
किसलेले गाजर (आवश्यकतेनुसार)
तेल – (आवश्यकतेनुसार)
मीठ – चवीप्रमाणे

स्प्रिंग रोल बनविण्यासाठीची कृती:

स्प्रिंग रोल बनविण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे असलेला एक पॅन घ्या आणि गॅस वर ठेवून गॅस पेटवा. नंतर तपॅन वर तेल घाला आणि साधारण एक ते दोन मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर पॅन मध्ये चिरलेला कांदा आणि चिली सॉस घालून साधारण एक मिनिटे व्यवस्थित परतवून घ्या. त्यानंतर गाजर, कोबी, शिमला मिरची घाला आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगल्याप्रकारे परतवून घ्या. त्यामध्ये तुम्ही सोया सॉस आणि व्हिनेगर देखील घालू शकता. भाज्या साचांग्ल्टपराकारे परतवून झाल्यावर त्यात मीठ, मिरपूड, मिरची पावडर असे मसाले घालू शकता. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. अश्या प्रकारे स्प्रिंग रोल चे स्टफिंग तयार केले जाते. त्यानंतर रॅपर्स तयार करण्यासाठी तुमच्याकडील असलेले एक भांडे घ्या त्यात मीठ, मैदा, आणि कॉर्नफ्लॉवर घाला. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून फेटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण गुळगुळीत झाले पाहिजे. रॅपर्स तयार झाल्यावर त्यामध्ये भाजीचे स्टफिंग टाका आणि पॅन वर गरम करा. नंतर त्यामध्ये थोडे तेल घालून आवरण तळून घ्या रॅपर्स कुरकुरीत होईपर्यंत चांगल्याप्रकारे तळून घ्या. अशाप्रकारे तुमचे स्प्रिंग रोल तयार होतील.

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा पनीरचा हा चमचमीत पदार्थ…. जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

हॉटेल स्टाईल Crispy Chili Chicken बनवा घरच्या घरी…

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते Samruddhi Mahamarg च्या दुसऱ्या टप्प्याचं झाले उद्घाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss