Saturday, April 27, 2024

Latest Posts

घरच्या घरीच तयार करा, कुरकुरीत Kurkure!

लहानांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे कुरकुरे. लहानांप्रमाणे मोठ्यांना ही कुरकुरे तेवढेच आवडतात. जर आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर आपण सर्व कुरकुरे हा ऑप्शन निवडतो.

लहानांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे कुरकुरे. लहानांप्रमाणे मोठ्यांना ही कुरकुरे तेवढेच आवडतात. जर आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर आपण सर्व कुरकुरे हा ऑप्शन निवडतो. कुरकुरे खाण्याचे प्रेमी प्रचंड प्रमाणात आहे. परंतु विकतरित कुरकुरे अतिप्रमाणात खाणे हे आपल्या शरीराला चांगले नसते तसेच आरोग्याला देखील हानिकारक असते. म्हणूनच दुकानांमध्ये कुरकुरे खाण्यापेक्षा घरच्या घरी कुरकुरे तयार करून खाणे आरोग्यास चांगले असते.

कुरकुरे दिसायला खूप आकर्षक व चवीला सुद्धा प्रचंड चटपटीत असतात. अनेकांना कुरकुरे खायला खूप आवडतात परंतु ते बनवायचे कसे हे माहित नसते. आपण हे चटपटीत कुरकुरे घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. हे कुरकुरे बनवण्यासाठी फक्त १ वाटी बेसन पिठाची आवश्यकता असते. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी चटपटीत कुरकुरे कसे तयार करावे ते पाहूया.

कुरकुरे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

बेसन
तांदळाचे पीठ
लाल तिखट
पाणी
तेल
चाट मसाला
मीठ

कुरकुरे बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्व प्रथम एका भांड्यात एक कप बेसन घ्यावे. त्यात दीड कप तांदळाचे पीठ, १ चमचा लाल तिखट घालून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ तयार करावे. पीठ करत असताना लक्षात ठेवा की पीठ जास्त पातळ नसावे अन्यथा कुरकुरे क्रिस्पी होणार नाहीत. पीठ तयार करून झाल्यावर एका साच्यात कुरकुरेसाठी बनवलेले पीठ घालून साचा बंद करावा. दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात लांब आकाराचे कुरकुरे पाडून घ्यावे. हे कुरकुरे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. कुरकुरे तळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे आणि त्यात वरून चाट मसाला, चवीनुसार मीठ किंवा आवडीचा कोणताही मसाला घालून मिक्स करावे. हे कुरकुरे एका हवाबंद डब्यात झाकून ठेवावे.

अशा प्रकारे चमचमीत, टेस्टी आणि क्रिस्पी कुरकुरे खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा:

तरुणांसाठी आनंदाची बातमी, पुण्यामध्ये ४०,००० नोकऱ्या होणार उपलब्ध

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss