Saturday, April 27, 2024

Latest Posts

तुम्हाला धूम्रपानाचे व्यसन सोडायचे? तर ‘हे’ काही घरगुती उपाय…

सध्याच्या काळात धूम्रपान करणे हा एक ट्रेंडच बनला आहे. यामुळे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. धुम्रपानामुळे अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

सध्याच्या काळात धूम्रपान करणे हा एक ट्रेंडच बनला आहे. यामुळे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. धुम्रपानामुळे अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे फुफ्फुसावर गंभीर परिणाम होतो. तसेच धूम्रपान केल्याने श्वसनसंस्था, रक्ताभिसरण, प्रजनन यंत्रणा, त्वचा, डोळे यांवर वाईट परिणाम होतो कधी कधी तर धूम्रपान जीवावर ही बेतू शकते. यामुळेच धूम्रपान तातडीने सोडणे गरजेचे आहे. धूम्रपान सोडण्यास मदत करणारे काही घरघुती उपाय आपण जाणून घेऊयात.

मध व लिंबाचा रस –

धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. खरंतर त्यामध्ये प्रथिने, एन्झाईम्स आणि इतर जीवनसत्त्वे आढळतात. यासाठी तुम्ही रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून सेवन करू शकता

तांब्याच्या भांड्यातील पाणी –

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे प्यायल्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. हे पाणी प्यायल्याने तुमचे धूम्रपानाचे व्यसन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

दालचिनी –

धूम्रपानापासून दूर राहण्यासाठी तुम्ही दालचिनीची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही नियमितपणे काही काळ दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवू शकता.

त्रिफळा पावडर –

त्रिफळा चूर्ण धूम्रपान सोडण्यासाठी वापरता येते. यासाठी रोज झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण खावे.

तुळशीची पाने –

तुळशीची पाने ही औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावा. असे केल्याने तुम्ही धूम्रपानाच्या सवयीपासून मुक्त होऊ शकता.

व्यायाम करा –

धूम्रपान कमी करण्यासाठी, तुम्ही नियमितपणे व्यायाम सुरू करू शकता. यासोबतच फुफ्फुसात साठलेले निकोटीनही कमी होऊ लागते.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss