Friday, April 26, 2024

Latest Posts

ड्रॅगन फ्रुटचे सेवन केल्याने कॅन्सरवर मात करता येते, जाणून घ्या अनेक फायदे

आपण अनेक फळांच्या फायद्यांबद्दल ऐकले असेल. पण तुम्ही ड्रॅगन फ्रुट (Dragon fruit) बद्दल ऐकून आहात का? हे ड्रॅगन फ्रुट आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. या ड्रॅगन फ्रुटचे सेवन आपण जर नियमित करत राहिलो तर आपल्याला कोणत्याच आजारांना सामोरे जावे लागणार नाही.

आपण अनेक फळांच्या फायद्यांबद्दल ऐकले असेल. पण तुम्ही ड्रॅगन फ्रुट (Dragon fruit) बद्दल ऐकून आहात का? हे ड्रॅगन फ्रुट आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. या ड्रॅगन फ्रुटचे सेवन आपण जर नियमित करत राहिलो तर आपल्याला कोणत्याच आजारांना सामोरे जावे लागणार नाही. आपण आपली तब्येत बिघडल्यावर औषधांवर (Medicines) भरपूर प्रमाणात खर्च करतो. पण आपल्यावर तशी वेळ आणूच का देतो? आपल्याला त्या कडू औषधांवर पैसे खर्च करायला काहीच वाटत नाही. पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी ही आधी पासूनच घेतली तर तुम्हाला पुढे जाऊन औषधांवर पैसे खर्च करण्याची वेळीच येणार नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फळे, भाज्या, पालेभाज्या खाल्ल्यात तर तुमचे आरोग्य कधीच खराब होणार नाही. तुमचे आरोग्याचं बिघडले नाही तर तुम्हाला कधीही डॉक्टरांकडे (Doctor) जाण्याची वेळ येणार नाही. फळांमधून आपल्याला भरपूर पोषक घटक मिळतात. ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. रोज फळांचे सेवन केल्याने आपले शरीर सुधृढ बनते. आपली रोगप्रतिकार शक्ती (Immunity power) वाढते. आज आपण ड्रॅगन फळाचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेणार आहोत.

तुम्ही आज पर्यंत अनेक फळे खाल्ली असाल. पण ड्रॅगन फ्रुट आणि त्याच्या फायद्याबद्दल अगदी कमी लोकांना माहिती आहे. पण तुम्हाला माहित आहे का?ड्रॅगन फ्रुट हे अनेक औषधी गुणधर्माने समृद्ध आहे. यामध्ये अनेक पोषक घटक आहेत ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे फळ खाल्याने तुम्ही कॅन्सरसारख्या भयंकर आजारांवरही मात करू शकतात. ड्रॅगन फ्रुटची लागवड ही महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, ओडिसा, अंदमान निकोबार, तामिळनाडू तसेच आंध्रप्रदेश यांसारख्या राज्यात होते. या फळाचे नियमित सेवन केल्याने आपल्याला प्रथिने, फायबर, लोह यांसारखे पोषक तत्वे मिळतात. हे पोषक घटक आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. या फळांपासून आपल्याला कॅलरीज, व्हिटॅमिन A, B, C भरपूर प्रमाणात मिळते. याचे अजून काही फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.

कॅन्सरवर मात – (beat cancer)

ड्रॅगन फ्रुटचे नियमित सेवन केल्यावर आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिलोलिक ऍसिड आणि बीटासामाइन सारखे अँटीऑक्सिडंट्स असून ते आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स काढतात. म्हणून कॅन्सरचा धोका कमी होतो.

मधुमेहावर मात – (Overcome diabetes)

मधुमेह असलेल्यांना नेहमी प्रश्न पडतो की कोणते फळ खावे आणि कोणते नाही. पण ड्रॅगन फ्रुट हे मधुमेहावर मात करण्यास आपली मदत करते. ड्रॅगन फ्रुटचा उपयोग आपल्या रक्तात असलेली साखर कमी करण्यास होतो. ड्रॅगन फ्रुट नैसर्गिकरित्या इन्सुलिन वाढवू शकते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी या फळाचे सेवन करणे आवश्यक आहे.

प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत – (Help increase immunity)

ड्रॅगन फ्रुटमध्ये अनेक पोषक घटक असतात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. ड्रॅगन फळाचे सेवन केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आपल्याला कोणतेही आजार होत नाहीत.

वजन कमी करण्यास मदत – (Help to lose weight)

अनेक जण वजन कमी करण्यासाठी भरपूर उपाय करतात. ड्रॅगन फ्रुटचा वापर हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. या फळामध्ये फायबर असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी या फळाचे सेवन करते गरजेचे आहे.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

बनवा घरगुती उपमा प्रिमिक्स ; प्रवासातही मोलाची साथ

महाराष्ट्रीयन मुलीने परदेशात केले मोठे नाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss