Saturday, April 27, 2024

Latest Posts

होळी पार्टीसाठी कूल दिसायचं असेल तर ही’ कुर्ती जीन्ससोबत ट्राय करा

होळी सणाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

होळी सणाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. होळी ही २५ मार्चला आहे. पण आजपासूनच सगळीकडे होळी पार्टीला सुरवात झाली आहे. सगळ्यांनाच एकत्र होळी खेळायची असते. पण सुट्टी असल्याने ऑफिसमध्ये ‘प्री पार्टी’ ठेवण्यात येते. तर काही ठिकाणी होळीच्याच दिवशी पार्टी केली जाते. ज्या पार्टीमध्ये अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित असतात. जर तुमचा पण होळी पार्टीला जाण्याचा विचार असेल तर तुम्ही जीन्ससोबत कुर्ती घालू शकता.त्यामुळे तुम्ही पार्टी मध्ये सोयीस्कर राहू शकता. तुम्ही पार्टी आरामात मज्जा-मस्ती करू शकता. आणि पार्टीमध्ये वेगळेच दिसू शकता.कुर्तीचे भरपूर प्रकार आहेत. चिकनकारी वर्कची रंगबिरंगी कुर्ती, चिकनकारी वर्कची रंगबिरंगी कुर्ती, शॉर्ट कुर्ती इत्यादी तुम्ही पार्टीसाठी वापरू शकता.

चिकनकारी वर्कची रंगबिरंगी कुर्ती

पार्टीमध्ये जर तुम्हाला वेगळा दिसायचं असेल तर चिकनकारी वर्कची कुर्ती घालू शकता. चिकनकारी वर्कची बहुरंगी कुर्ती खूप छान असतात. या फुल स्लीव्हज कुर्ती तुम्ही जिन्सवर घालू शकता . शक्यतो नेकलाइनला खोलवर कुर्ती घेणं टाळा. व्ही शेप नेकलाइन किंवा स्क्वेअर नेकलाइन खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही सुंदर दिसाल. कमी रंगाची हि कुर्ती तुम्हाला भेटेल. या प्रकारची कुर्ती तुम्ही २०० ते २५० रुपयांना खरेदी करू शकता.

कॉटन प्रिंट कुर्ती

जर तुम्हाला पार्टीसाठी कुर्ती घालायची असेल तर तुम्ही कॉटन प्रिंटची कुर्ती घालू शकता. कॉटन कुर्ती जीन्सवरती चांगली दिसेल. फक्त तुम्ही या कुर्ती घेताना नेकलाइन आणि स्लीव्हज लक्षात ठेवा. अश्याप्रकारची कुर्तीच घेताना प्लेन किंवा मल्टीकलरमध्ये खरेदी करू शकता. अश्या कुर्तीमध्ये तुम्ही उठून दिसाल. कॉटन प्रिंट कुर्तीच तुम्हाला मार्केटमध्ये २०० ते ३०० रुपयांना खरेदी करू शकता.

शॉर्ट कुर्ती

शॉर्ट कुर्तीच सर्व महिलांना घालायला खूप आवडतात. अशी कुर्ती होळी पार्टीसाठी तुम्ही घालू शकता. स्ट्रेट, ए-लाइन किंवा गराखा स्टाइल कुर्ती खरेदी करू शकता. तुमचा होळी पार्टीसाठी लुक खूप वेगळा दिसेल. यासाठी कलरफुल प्रिंट किंवा प्लेन व्हाईट कुर्तीच घेऊ शकता. या होळी पार्टीसाठी ३ कुर्तीच डिझाइन करून पहा.या पार्टीमध्ये तुम्ही चांगले दिसाल आणि फोटोही चांगले येतील. जीन्समध्ये तुम्ही या प्रकारचे कुर्ती दररोजसाठी पण वापरू शकता. या कुर्त्या ऑनलाइन मागवण्यापेक्षा बाजारात जाऊन खरेदी करा. जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे समजेल तुम्ही त्या कुर्तीचमध्ये कसे दिसता.

हे ही वाचा:

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनकडे आहे ‘एवढ्या’ कोटीची संपत्ती,पती अभिषेक बच्चनलाही टाकले मागे

ठाकरेंच्या हालचालींना वेग; कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे अशी लढत होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss