Saturday, April 27, 2024

Latest Posts

ओठांचा काळा रंग दूर होण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर करा..

अनेकजण आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मेकअप करतात. मेकअप मुळे आपले सौंदर्य अजूनच खुलून दिसते. मेकअप करण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रोडक्टस गरज भासते. मेकअप साठी लागणारी बरीच उत्पादने बाजारात विकत मिळतात

अनेकजण आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मेकअप करतात. मेकअप मुळे आपले सौंदर्य अजूनच खुलून दिसते. मेकअप करण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रोडक्टस गरज भासते. मेकअप साठी लागणारी बरीच उत्पादने बाजारात विकत मिळतात. बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टस (Products) मध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स (Chemicals) चा वापर केला जातो. त्यामुळे मेकअप केल्यावर आपल्या त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक जणांना या प्रोडक्टसचा भरपूर त्रास होतो. मेकअपच्या साहित्यामधील प्रमुख प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक (Lipstick). आपले सौंदर्य वाढविण्यात लिपस्टिकचा वापर अधिक असतो. मात्र लिप्स्टिकच्या अतिवापरामुळे आपल्या ओठांचा रंग हा काळा होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या ओठांवर सुरकुत्या येऊन ओठांचा रंग गडद होतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य कमी होऊ लागते. मात्र ओठांचा रंग हा लिपस्टिकमुळेच नाही तर इतर अनेक कारणांमुळे बदलू शकतो. धूम्रपानाचे सेवन, औषधांचा साईड इफेक्ट (Side effects), त्याचबरोबर काही आजारांमुळे देखील आपल्या ओठांचा रंग बदलू शकतो. अश्या या ओठांच्या समस्येसाठी त्यावर काही घरगुती उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे घरगुती उपाय.

ओठांना स्क्रब करा:

आपल्या त्वचेवरील मृत त्वचा (Dead skin) काढण्यासाठी आपण जसा स्क्रबचा वापर करतो तसाच आपल्या ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठी वेळोवेळी स्क्रब करणे अनिवार्य आहे. ओठांवर स्क्रब केल्याने आपल्या ओठांवरील डेड स्किन निघून जाते. तुम्ही हा स्क्रब घरघुतीरित्या करू शकता. यासाठी सर्वप्रथम मध आणि बदामाचे तेल योग्य प्रमाणात घेऊन त्यात थोडी साखर घालून व्यवस्थित मिसळून घ्या. आणि हलक्या हाताने ओठांवर लावा. यामुळे तुमच्या ओठांचा गडद रंग कमी होईल आणि तुमचे ओठ मुलायम होतील.

ओठांचे पोषण करा:

आपण आपल्या त्वचेची नेहमीच निगा राखत असतो. शिवाय आपल्या शरीराला योग्य ते पोषण देऊन आपण आपल्या शरीराची त्याचबरोबर आपल्या त्वचेची नेहमीच काळजी घेतो. त्याचप्रमाणे आपल्या ओठांना देखील पोषणाची गरज असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ओठाला एलोवेरा जेल अथवा कोणतेही चांगल्या ब्रँडचे मॉइश्चरायझर लावून ओठांना व्यवस्थितपणे मसाज करू शकता.

भरपूर प्रमाणात पाणी प्या:

पाण्याचे फायदे तर तुम्हाला ठाऊकच असतील. पाणी आपल्या शरीरासाठी किती गरजेचे आहे याबद्दल काही वेगळे सांगायला नको. पाण्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एकप्रकारचा ग्लॉ (Glow) येतो. आपण जर पुरेसे पाणी प्यायलो नाही तर आपले ओठ सुखे पडतात आणि तुमच्या ओठांचा रंग निघून जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे.

धूम्रपानाचे सेवन टाळणे:

धूम्रपान आपल्या शरीरासाठी अत्यंत वाईट आहे. कर्करोगासारखे गंभीर आजार आपल्याला धूम्रपानाचे सेवन केल्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे धूम्रपानाची सवय अत्यंत वाईट आहे.

हे ही वाचा:

गायीच्या दुधाला पर्यायी म्हणून हे दुधाचे प्रकार वापरू शकता; जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’चा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss