Tuesday, April 30, 2024

Latest Posts

आरोग्यासाठी गुणकारी अशा तुळशीच्या पानांचा उपयोग काय?

तुळशीच्या पानांचा वापर हा पूजेसाठी केला जातो. तुळस आरोग्यासाठी पण गुणकारी आहे. तुळस घरात लावल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही. तुळशीचा वापर हा आयुर्वेदामध्ये पण केला आहे. तुळस ही हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते. ज्या घरात तुळस असेल त्या घरात आजारपण येत नाही असं मानले जाते. त्यामुळे शरीराला तुळशीचे  काय फायदे होतात, हे तुम्हाला माहिती आहेत का?

  • तुळशीच्या पानांचा सुगंध हा तीव्र असतो. त्यामुळे श्वासाच्या दुर्गंधीची समस्या असेल त्यांनी रोज सकाळी १ ते २ तुळशीची पानांच सेवन करावे. यामुळे चांगले परिणाम होतील.
  • तुळशीची पाने खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • सर्दी, ताप, आला की कफच त्रास होतो, त्यावेळी तुळशीची पाने, काळी मिरी, गूळ लवंग, आलं गरम पाण्यात टाकून काढा तयार करा. या काढ्याचा वापर कफचा त्रास झाल्यास करा.
  • काही महिलांना मासिक पाळी अनियमित येण्याच्या समस्या असतात. त्यावेळेस तुळशीची पाने खाल्ल्यास समस्या सुटू शकतात.
  • एखाद्यावेळेस जखम झाल्यास तुरटीमध्ये तुळशीची पाने टाकून लावल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
  • सध्या डोकेदुखीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे घरगुती उपाय म्हणून आल्याचा आणि तुळशीचा चहा करून प्यावा. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
  • बाहेरचे खाल्याने पोट खराब होते. जुलाब, उलटीसारखे त्रास होतो. अशावेळेस जिरे आणि तुळशीचे पाने वाटून चाटण तयार करून घ्या. हे चाटण ३ ते ४ वेळा घेतल्यास लवकर फरक जाणवतो.

हे ही वाचा: Eknath Shinde यांनी रडीचा डाव बंद करावा, Raju Shetti यांचे वक्तव्य ‘स्वतः च्या पुतण्याचे डोके फोडले आणि रडत राहिले,’ BJP नेत्याचे Nana Patole यांच्यावर गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss