Saturday, April 27, 2024

Latest Posts

Odisha रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय, Mumbai-Madgaon Vande Bharat Express चा उद्घाटन कार्यक्रम रद्द

आज दिनांक ३ जून २०२३ रोजी मुंबई-मडगाव (Mumbai Goa Vande Bharat Express) दरम्यान धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा (Vande Bharat Express) उद्घाटन सोहळा आयोजन करण्यात आला होता.

आज दिनांक ३ जून २०२३ रोजी मुंबई-मडगाव (Mumbai Goa Vande Bharat Express) दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा (Vande Bharat Express) उद्घाटन सोहळा आयोजन करण्यात आला होता. परंतु काळ रात्री ओडिशामध्ये मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

आज मुंबई-मडगाव ‘वंदे भारत एक्स्प्रेसचा उदघाटन सोहळाचा कार्यक्रम हा रद्द करण्यात आला आहे. या वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथे उदघाटन सोहळा पार पाडणार होता. या संपूर्ण कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्याची पहिली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. मुंबई-मडगाव ही भारतातील १९ वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. मुंबई ते मडगाव हे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस ७ तास ५० मिनिटात पूर्ण करणार आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा फायदा होणार आहे. मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस चालवण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार, सीएसएमटी वरून सकाळी ५:३५ ला एक्सप्रेस सुटेल, तर मडगाव येथे दुपारी१:१५ वाजता वंदे भारत एक्सप्रेस पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी २:३५ वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री १०:२५ वाजता एक्सप्रेस मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस फक्त ७ तास ५० मिनटात सीएसएमटी ते मडगाव हे अंतर कापणार आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेन थांबेल.या मुळे चाकरमान्यांना प्रचंड फायदा होणार आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss