Monday, April 29, 2024

Latest Posts

संविधान बदलाबद्दल Chandrakant Patil यांचे मोठे व्यक्तव्य, डिबेट करायलासुद्धा तयार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विविध पक्षांमधील नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप, टीका टिपण्या यांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता भाजपचे (BJP) नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली आहे. काँग्रेसकडून भाजपवर सतत होत असलेल्या संविधान (Constitution of India) बदलण्याच्या आरोपांवर उत्तर देताना ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “संविधान कधीही बदलता येणार नाही. त्यात दुरुस्ती करण्यात येते. विरोधकांकडून होत असलेले आरोप जुने झाले असून मी यावर डिबेट करायला तयार आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “संविधान कधीही बदलता येत नाही, त्यात दुरुस्ती करण्यात येते. आतापर्यंत संविधानात १०६ वेळा दुरुस्ती झाली आहे. यातील बहुतेक दुरुस्त्या काँग्रेसच्या काळात झाल्या आहेत. अलीकडे मोदीजी यांनी २ दुरुस्त्या केल्या आहेत. मोदीजी यांनी २६ नोव्हेंबरला घटना दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. विरोधकांकडून संविधान बदलाचे आरोप जुने झाले असून मी यावर डिबेट करण्यास तयार आहे.”

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करत ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत. संपूर्ण देशाला त्यांनी दिलेली घटना फार मोठी देणगी आहे. पुढचे हजार वर्ष घटनेचा मूळ भाव बदलावा लागणार नाही. जगामध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. बाबासाहेबांमुळेच मोदींसारखे चहावाल्याच्या घरात जन्म घेणारे पंतप्रधान बानू शकले.”

हे ही वाचा:

BJP चा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, Nana Patole यांचा घणाघात

Uddhav Thackeray गद्दार, सायकिक, त्यांची Shivsena नकली, Narayan Rane यांची सडकून टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss