Monday, April 29, 2024

Latest Posts

राज ठाकरेंना नाशिक लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी मनसैनिकांची पत्राद्वारे विनंती

काही दिवसांआधी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

काही दिवसांआधी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता नाशिकच्या जागेसाठी मनसेप्रमुख राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सध्या जोरदार चर्चेत आहे. या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी अनेक बडे नेते देखील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक लोकसभेची जागा लढवावी यासाठी मनसैनिकांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी आणखीन एका मोठ्या नेत्यांचे नाव पुढे आले आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून अजूनही नाशिक लोकसभेच्या जागेसाठी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. काही दिवसांआधी राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार अश्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र यावर अजूनही कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही. दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी यान तीन जागेची मागणी मनसेने भाजप समोर ठेवली होती. नाशिकची जागा जर मनसेला मिळाली तर मनसेची उमेदवारी राज ठाकरे यांनीच करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे . मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहीत मागणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे आता काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

मनसे पक्षाची स्थापना झाल्यानंतर मनसेचे नाशिकमधून १२ नगरसेवक निवडणून आले होते. तर पाच वर्षेनंतर नाशिक शहरात ४० नगरसेवक, तीन जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य व ग्रामीण भागात १५ नगरसेवक असे मनसेकडून जिंकून आले होते. मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, संदीप भवर, किरण क्षीरसागर, संदीप जगझाप, रोहन जगताप, विजय ठाकरे, संजय देवरे, नितीन धानापुणे, महेंद्र डहाळे या सर्व मनसैनिकांनी राज ठाकरे यांना विनंती केली आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक उमेदवार जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Manoj Jarange यांची घोषणा, मराठा उमेदवार उभा केला तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss