Friday, April 26, 2024

Latest Posts

पोनियिन सेल्वन २ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

पोनियिन सेल्वन भाग १ ला प्रेक्षकांची चांगलाच प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वीच पोनियिन सेल्वन भाग २ (Ponyyin Selvan 2) हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटांने तीन दिवसातच बॉक्स ऑफिस वर दमदार कामे केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्न यांना अनेक वर्षांपासून लोकप्रिय पुस्तकावर चित्रपट बनवायचा होता आणि अखेरीस गेल्या वर्षी तो प्रदर्शित करण्याची त्यांना संधी मिळाली.

दिग्दर्शक मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन २ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच ८० कोटींची कमाई केली आहे.
बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा नवा चित्रपट पोन्नियिन सेल्वन २ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. पोन्नियिन सेल्वन २ या चित्रपटाला देशातील तमिळ भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दोन भागांचा हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या १९५५ मध्ये आलेल्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे. मणिरत्नम यांना अनेक वर्षांपासून लोकप्रिय पुस्तकावर चित्रपट बनवायचा होता आणि अखेरीस गेल्या वर्षी तो प्रदर्शित करण्याची त्यांना संधी मिळाली.
अभिनेते विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, पार्थिवन, रहमान आणि विक्रम प्रभू या महाकाव्य नाटकाच्या दुसर्‍या भागात त्यांच्या भूमिका पुन्हा सादर केली आहे.
पोनियिन सेल्वन २ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता विक्रम यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. पोनियिन सेल्वन भाग १ मध्ये कादंबरी मालिकेचा एक तृतीयांश भाग समाविष्ट आहे आणि उर्वरित भाग दुसऱ्या भागात सांगण्यात आला आहे.
चोल राजवंशाची कथा आहे. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्तीच्या त्याच नावाच्या पाच भागांच्या कादंबरी मालिकेचे रूपांतर आहे.

हे ही वाचा : 

Vajramuth Sabha, Uddhav Thackeray Live, आंदण नाही तर मुंबई लढून मिळवली आहे,

Ashok Chavan Live, मुंबई महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी तयारीला लागायचं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss