Tuesday, April 30, 2024

Latest Posts

‘ओमदादा जिगरका तुकडा’ Om Rajenimbalkar यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना Aaditya Thackeray यांचे उदगार

ओमराजे नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे (Dharashiv Loksabha Constituency) उमेदवार ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी आज (मंगळवार, १६ एप्रिल) मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), आमदार रोहित पवार (Rohit Pawar), माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मला अनेक ठिकाणांहून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी बोलावलं होतं. पण मी सगळ्यांना सांगितलं माझा ओमदादा अर्ज भरायला जातोय तर मला आधी तिथेच जावे लागणार. महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार माझ्याचसाठी महत्त्वाचा आहे. पण, ‘ओमदादा जिगर का तुकडा’ आहेत. यावेळी, रोहित पवार, अमित देशमुख हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. महाविकास आघाडीतील या युवा नेत्यांनी ओम राजेनिंबाळकर यांना आपला पाठिंबा दर्शवला.

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत ते म्हणाले, “शेतकऱ्यांना अनुदानाचे पिसे मिळत नाहीत. शेतमालाला भाव नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहेत, म्हणूनच धाराशिवची हि मशाल आपल्याला दिल्लीला पाठवायची आहे.” “हि लढाई गदर विरुद्ध निष्ठावंत अशी आहे. ओमदादाही तिकडे जाऊ शकले असते. गद्दारी करू शकले असते. त्यांच्यासोबत इथे उभे असलेले आमदार कैलास पाटील यांनी तर मिंध्याच्या गाडीतून उद्धव ठाकरे यांना फोन केला. मिंध्याच्या गाडीला लाथ मारून ते पुन्हा आले.”

हे ही वाचा:

उन्हाळ्याच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, RAJ THACKERAY यांचा सवाल

Satara Loksabha Constituency चा तिढा सुटला, Udayanraje Bhosale यांना BJP कडून उमेदवारी जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss