Saturday, June 3, 2023

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिले सडेतोड उत्तर

कर्नाटकमधील प्रचार सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे.

कर्नाटकमधील प्रचार सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.आम्ही साडे तीन जिल्ह्यातले आहोत. तर, त्यांनी आमच्या नेत्यांबाबत चिंता करता कामा नये. भाजपचे नेते राष्ट्रवादी बद्दल नेहमीच बोलत असतात. शिवसेना फोडली…आणि काँग्रेसबद्दलही तसाच प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या सातारा जिल्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दैनिक सामनातील अग्रलेखावर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. अजित पवार म्हणाले की, राज्यामध्ये वेगवेगळी वृत्तपत्रे असून त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या भूमिका मांडण्याचे काम संपादक करत असतात. त्या वृत्तपत्रांमधील मत हे राज्यामधील लोकांचे नाही असे पवार यांनी सांगितले. निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कर्नाटकमध्ये गेले आहेत.. त्यावर अजित पवार त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अवकाळी पावसामुळे राज्यावर संकट असताना मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये गेले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याची आवशक्यता आहे असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss