Saturday, April 27, 2024

Latest Posts

आता लवकरच सुरु होणार ‘भवानी तलवार’ दर्शन यात्रा

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांची 'भवानी तलवार' लंडनहून पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारच्या मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांची ‘भवानी तलवार’ लंडनहून पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारच्या मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.भाजपचे नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेली भवानी तलवार इंग्लंडवरून आणण्याचा करार अंतिम टप्प्यात आला आहे अशी माहिती दिली आहे.

लवकरच भवानी तलवार महाराष्ट्रात आणण्यात येणार असून पुढील काळात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात भवानी तलवार यात्रा काढण्यात येणार असल्याचे सुद्धा मुनगंटीवार यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला सहा जून रोजी ३५० वे वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यभरात यात्रा काढण्यात येणार असून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात ही भवानी तलवार यात्रा नेण्यात येणार आहे.तसेच राजा शिवछत्रपती राजा हे बाबासाहेब पुरंदरे लिखित नाटक प्रत्येक जिल्हात दाखवण्यात येणार आहे. नाटकाचे प्रत्येकी ४ शो लावण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला इतिहासाला सहा जून रोजी ३४९ वर्ष पूर्ण होऊन ३५० वर्ष सुरू होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारने हा विशेष कार्यक्रम आखला आहे. भवानी तलवारीच्या दर्शन राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला घेता यावं यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत संविस्तर माहिती दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या देश कार्यसमिती बैठकीत मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास असणाऱ्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष उत्साहात साजरे करायचे आहे. या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचावे असा मानस आहे. येणाऱ्या २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करुन सर्व शिवप्रेमीना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी सुरू आहे. यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्तादेखील सहभागी व्हावा अशी इच्छा आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे एक कल्याणकारी राजे होते म्हणूनच जिजाऊ यांनी महाराजांना राज्याभिषेकाचा सांगितलेला अर्थ आजच्या पिढीपर्यंत प्रबोधन, कीर्तन आणि विविध उपक्रमातून पोहोचविण्याचा मनसुबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप- शिवसेना सरकारने केला आहे. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे 350वे वर्ष असल्यामुळे राज्य सरकार द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि सगळे मिळून हा शिवराज्याभिषेक सुवर्णमहोत्सव संस्मरणीय करूया, असे आवाहन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आणि अभिमान असणाऱ्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष हे उत्साहात साजरे करायचे आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मनात पोहोचले पाहिजे. २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित या कार्यक्रमाचे सूक्ष्म व शिस्तीत नियोजन करुन सर्व शिवप्रेमीना सोबत घेऊन हा सोहळा दिमाखदार , भव्यदिव्य आणि मोठा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी सुरू आहे. यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्तादेखील सहभागी व्हावा अशी इच्छा आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळं ‘जगदंबा तलवार’ पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. तसंच, २०२४ पर्यंत शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पाठपुरावा करु असे संकेत त्यांनी दिले आहे.”भवानी तलवार’ ही आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे.

हे ही वाचा : 

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरील बंगालमधील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली, ममतांबरोबर निर्मात्यांनाही झापलं!

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

शूटिंगच्या दरम्यान सलमान खानला झाली दुखापत, चाहते चिंतेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss