Tuesday, June 6, 2023

Latest Posts

Karnataka Assembly election 2023, निकालानंतर Rahul Gandhi यांची पहिली प्रतिक्रिया, भांडवलशाहीला…

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता ही सर्वांना लागली होती. संपूर्ण देशाचं लक्ष हे कर्नाटकच्या निकालाकडे लागले होते. कर्नाटकात काँग्रेसचा बहुमताने आघाडीवर आहे .

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता ही सर्वांना लागली होती. संपूर्ण देशाचं लक्ष हे कर्नाटकच्या निकालाकडे लागले होते. कर्नाटकात काँग्रेसचा बहुमताने आघाडीवर आहे . सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या अर्ध्या तासातच कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे काँग्रेसच्या कर्यकर्यांचा जल्लोष हा सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस च्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक ट्विट देखील करण्यात आले होते आणि नुकतीच राहुल गांधी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

आज माध्यमांशी बोलत असताना राहुल गांधी यांनी सर्वात प्रथम उमदेवारांचे, कार्यकर्त्यांचे, जनतेचे आभार आणि अभिनंदन हे केले आहे. कर्नाटकाच्या या निवडणुकांमध्ये शक्तीने ताकदीला हरवले आहे. आणि हे आता प्रत्येक राज्यात आता होणार आहे. काँग्रेस हा पक्ष कर्नाटकात गरिबांसोबत उभी राहिली. आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो. आम्ही द्वेष आणि वाईट विचारसरणीने ही लढाई लढली नाही. आम्ही प्रेमाने, आपुलकीने ही लढाई लढवली होती. कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले कि त्यांना प्रेम आवडते. आज सामान्य जनतेला भांडवलशाहीला हरवले आहे. आज कर्नाटकात द्वेष चा बाजार हा बंद होऊन प्रेमाचं दार हे उघडलं आहे असं देखील आज राहुल गांधी म्हणाले आहेत.

तसेच राहुल गांधी हे पुढे म्हणाले आहेत की, हा सर्वांचा विजय आहे. सर्वात आधी हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. आम्ही लोकांच्या मुद्यावर ही निवडणूक लढलो आहे. आम्ही निवडणुकीच्या कालावधीत कर्नाटकातील गरीब जनतेला ५ आश्वासने ही दिली होती. आमी यासर्व आश्वासनांना पहिल्या दिवशी पहिल्या कॅबिनेट बैठकीत पूर्ण करू. आता कर्नाटकात द्वेषाचा बाजार हा बंद झाला आहे असं देखील आज राहुल गांधी म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

भाजपा हा पराभव सहन करणार नाही,काहीतरी कुरखुड्या भाजप गोट्यातून सुरूच राहतील – पृथ्वीराज चव्हाण

Karnataka Assembly election 2023, ‘या’ पक्षांना मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

Karnataka Assembly election 2023 Result, कर्नाटकात सत्तापालट, काँग्रेसचा दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss