Monday, June 5, 2023

Latest Posts

#LIVE सत्तासंघर्षाचा निकालानंतर पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे आणि शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाचा कोर्टामध्ये पराभव झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कोर्टाने निर्णय दिला आहे. या निकालाच्या आधीच अनेक नेत्यांनी त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राने अनेक अंदाज वर्तवले जात होते. परंतु अपात्र आमदारांचा निर्णय हा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वाच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या संधर्भात आज जो निकाल दिलेला या निकाल बद्दल आम्ही पूर्ण समाधानाक व्यक्त करतो आणि निश्चित पणे लोकशाहीचा पूर्णपणे विजय झालेला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा जो काही निकाल आहे त्यामधील ४-५ जे मुद्धे आहेत त्यापैकी मी काही मुद्द्यांवर प्रकाश टाकू इच्छितो. सर्वात आधी महाविकास आघाडीच्या मनसुभ्यावर पाणी फेरले आहे आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डिस्कॉलिफिकेशनचा जो पिस्टिशन आहेत या संदर्भातील सगळा अधिकार हा स्पीकर चा आहे आणि त्यामुळे हे स्पीकर डिस्कॉलिफिकेशनची पिस्टिशनवर सुनावणी घेतील. कोर्टाच्या न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारचा एक्सट्राऑर्डीनरी सिच्युएशन नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याला नकार दिला आहे. आणि ते स्पीकर चे अधिकार स्पीकर दिलेले आहेत. दुसरं म्हणजे ज्याच्या बद्दल पिटिशन सुरु आहे ते अशा आमदारांचे सर्व अधिकार हे पूर्णपणे त्यांना आहेत हे देखील कोर्टाने सांगितले आहेत.. ज्यांच्याविरुद्ध डिस्कॉलिफिकेशनचा जो पिस्टिशन चालू आहे त्यांना सगळे अधिकार आहेत असे सांगण्यात आले आहे. त्यांनतर इलेक्शन कमिशनला पूर्णपणे अधिकार आहेत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इलेक्शन कमिशन स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर जे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला होता. तो पूर्णपणे चुकीचा आहे आज ते स्पष्ट झाले आहे आणि हे कोर्टाने स्पष्टपणे सांगोतले आहे. पॉलिटिकल पार्टी कोणती आहे याचा निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा स्पीकरला दिले आहेत. महत्वाचे अधिकार हे स्पीकरला देण्यात आले आहेत. कोर्टाने हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आधी पण कायदेशीरच होत पण काही लोकांना शंका होती. मला असे वाटते की सर्वाच्च न्यायालयाने त्यांच्या शंकेचं समाधान केले असावे. आज उद्धव ठाकरे यांची मी पत्रकार परिषद मी बघितली त्यामध्ये ते असं म्हणाले मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात तेव्हाही नैतिकता कोणत्या डब्यामध्ये बंद केली होती तुम्ही नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये तुम्ही खुर्ची करता विचार सोडला आणि एकनाथ शिंदे यांनी विचाराकरिता खुर्ची सोडली. उद्धवजी तुमच्याकडे नंबर नाही तुम्हाला लोक सोडून गेले आहेत तुम्ही लाजेपोटी आणि भीतीपोटी राजीनामा दिला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss