Saturday, June 3, 2023

Latest Posts

शिंदे गटातील आमदाराने केलं मोठं विधान, अजित पवार…

गेल्या काही राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात अनेक घडामोडी या घडत होत्या.

गेल्या काही राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात अनेक घडामोडी या घडत होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजकारणात अनेक चर्चाना उधाण हे आले होते. तर राजकीय क्षेत्रात देखील चांगलीच खळबळ ही उडाली होती. पवारांनी सर्वांच्या आग्रहाखातर हा राजीनामा शरद पवार यांनी मागे देखील घेतला. परंतु या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदाराने एक मोठे विधान हे केले आहे.

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार यांना आता दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे आता ते टीका करतात, असं मोठं विधान करतानाच मुख्यमंत्री शेतात जाऊ शकत नाही का? मुख्यमंत्री काम करतात त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नये, असं आवाहन संजय शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना केलं.

सत्ता संघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. त्यावर अनेकजण कयास वर्तवत आहेत. निकालावर अंदाज वर्तवणाऱ्यांना शिरसाट यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. आधी निकाल येऊ दया मगच सर्वांनी आपलं ज्ञान पाजळावं. आज सर्व जण सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असं संजय शिरसाट म्हणाले. तसेच संजय शिरसाट पुढे म्हणाले आहेत की, तर संजय शिरसाट पुढे म्हणाले आहेत की देशात एवढे पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत. कारण महाविकास आघाडीचं काय झालं हे आपल्याला माहीत आहे. ते हवालदार फौजदार करत असले तरी आम्ही जनतेचे चोपदार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss