Friday, April 26, 2024

Latest Posts

चहा पत्तीचा फक्त चहा बनविण्यासाठी नाही तर ‘या’ गोष्टीसाठी देखील फायदा

चहा पत्तीचा उपयोग हा चहा बनविण्याच्या व्यतिरिक्त केसांच्या उत्तम आरोग्यासाठी देखील केला जातो. वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या केसांना अनेक इजा होतात. तसेच उन्हाच्या अति प्रखर सूर्यकिरणांमुळे आपले केस भरपूर डॅमेज (Damage) होतात.

चहा पत्तीचा उपयोग हा चहा बनविण्याच्या व्यतिरिक्त केसांच्या उत्तम आरोग्यासाठी देखील केला जातो. वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या केसांना अनेक इजा होतात. तसेच उन्हाच्या अति प्रखर सूर्यकिरणांमुळे आपले केस भरपूर डॅमेज (Damage) होतात. आपल्याला केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी आपण विविध उपाय करतो. बाजारातून मोठमोठ्या ब्रँड (Brand) चे जास्त महागडे प्रॉडक्ट्स आपण विकत घेतो. पण त्याचाही फारसा परिणाम आपल्याला जाणवत नाही. पण तुम्हाला माहित आहे का असे महागडे प्रोडक्टस घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच हेअर मास्क बनवू शकता तोही चहाच्या पानांपासून हा घरगुती उपाय केल्यावर तुमच्या केसांच्या मुळांना ताकद मिळते आणि ते मजबूत बनतात त्याचबरोबर तुमच्या केसांची वाढ देखील झटपट होते. त्याचे कारण म्हणजे चहाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट (Antioxidant), अँटीइंफ्लेमेटरी (Anti inflammatory), त्याचबरोबर अँटिसेप्टिक (Antiseptic) असे अनेक गुणधर्म असतात जे केसांची चमक टिकवून ठेवतात. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती हेअर मास्क (Hair Mask) बनवायचा तरी कसा?

चहाच्या पानांमधून केसांचे पाणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

  • १ किंवा २ चहाच्या टी बॅग्स
  • पाणी

चहा पत्तीच्या पानांपासून बनवायचे हेयरमास्क –

चहा पत्तीच्या मदतीने केसांचे पाणी बनविण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी घ्या. त्या वाटीमध्ये तुम्ही दोन कप पाणी घालावे तेच पाणी बऱ्यापैकी उकळून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये ती बॅग्स अथवा चहाची पाने घालून मिक्स करून घ्यावी. त्यानंतर ती पाने साधारण ४ ते ५ मिनिटे पाण्यातच ठेवून द्यावी.

चहा पत्तीचे पाणी केसांना कसे लावावे?

चहा पत्तीच्या पाण्याने केस धुण्याआधी केसांना शॅम्पू लावा आणि केस त्या चहा पत्तीच्या पाण्याने केस धुवा असे केल्याने तुमचे केस मजबूत आणि त्याचबरोबर चमकदार होतील.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss