Saturday, June 3, 2023

Latest Posts

संजय राऊत हाच सर्वात मोठा लँड माफिया, नितेश राणेंचा गंभीर आरोप

राजकारणामध्ये नितीश राणे आणि संजय राऊतांचा आरोप प्रत्यारोपाचं खेळ हा सुरूच आहे. संजय राऊत हा सर्वात मोठा लँड माफिया आहे.

राजकारणामध्ये नितीश राणे आणि संजय राऊतांचा आरोप प्रत्यारोपाचं खेळ हा सुरूच आहे. संजय राऊत हा सर्वात मोठा लँड माफिया आहे. आज पुन्हा एकदा त्याने पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांना त्याने भाषण माफिया म्हंटले आहे. परंतु संजय राऊत हाच सर्वात मोठा लँड माफिया आहे असा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला. अलिबागमध्ये किहीम या ठिकाणी असलेली जमीन धमक्या देऊन कमी किंमतीमध्ये त्याने विकत घेतली आहे. त्यासाठी मराठी कुटूंबाला त्याने त्या धमक्या दिला असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे. कैदी नंबर ८९५९ ची ही इच्छा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे मी कपडे फडावेत असे दिसत आहे. तो जर माझ्यावर आरोप करत असेल तर मी उत्तर देत राहणार. संजय राजाराम राऊत हा किती मोठा लँड माफिया आहे हे मी महाराष्ट्राला सांगतो आहे असे नितीश राणे म्हणाले.

अलिबागमधील किहीम बीचवर संजय राऊतला जागा घ्यायची होती त्यामुळे मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावामध्ये दमदाटी करून त्याने या जागा घेतल्या आहेत. त्या कुटूंबाचे नाव पुशिरकर असे आहे. किहीम बीचवर रिसॉर्ट बांधण्याचे याचे मनसुबे आहेत. संजय राऊत ने कोट्यवधींची जमीन अवघ्या १० कोटींमध्ये घेतली आहे. दुसऱ्यांना नेहमीच हा संजय राऊत माफिया बोलणारा स्वःत किती मोठा लँड माफिया आहे याचं उत्तर महाराष्ट्राला तू दिलं पाहिजेस. मुंबईमधल्या भांडुप, विक्रोळी या भागांमध्ये आर वरून सुरु होणाऱ्या बिल्डरसोबत तुझी पार्टनरशिप आहे त्या निमित्ताने तू किती लोकांच्या जमिनी बळकवल्या आहेत याचे तू संपूर्ण महाराष्ट्राला दे असे नितीश राणे म्हणाले.

मला बेळगावच्या माझ्या मराठी जनतेला सांगायचे आहे की हा जो आरोप कैदी नंबर ८९५९ जो रोज तुमच्यासमोर येतो आणि मराठी माणसाच्या हितासाठी भाषण करतो त्याची कोर्टामध्ये हजेरी आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये मराठी माणसाची अनेक घरे त्याने लुबाडली आहेत. त्याने मराठी माणसाला फसवलं आहे म्हणून त्याच्या पार्टनर सोबत त्याला आज कोर्टामध्ये जायचे आहे. हा जो बोंबलत असतो की माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो खोटारडा आहे. मी बेळगावच्या जनतेला सांगेन अशा दरोडेखोराला असल्या चाप्टर माणसाचं तुम्ही काही ऐकू नका ही माझी विनंती आहे. चपट्या पायाचा, घरफोड्या माणसाचं ऐकून चुकीच्या लोकांना मत देऊ नका. असल्या लोकांचं मात्र तुम्ही ऐकू नये. असे नितीश राणे म्हणाले.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss