Saturday, April 27, 2024

Latest Posts

Ujjwal Nikam यांनी व्यक्त केली अपेक्षा, राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल…

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा रखडलेला आहे. या निकालाची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा रखडलेला आहे. या निकालाची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा कधी लागणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अश्यातच आता त्यावर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी एक मोठे वक्तव्य केलं आहे. उज्वल निकम हे नाशिक मध्ये बोलत होते.

आज उज्वल निकम बोलत असताना म्हणाले आहेत की,तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी लागेल हे सध्या सांगणं अवघड असलं तरी मात्र सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश, घटनापिठातील निवृत्त होणार असल्याने निकाल लवकर लागेल ही अपेक्षा आहे. असंउज्वल निकम यांनी सांगितलं आहे. तसेच पुढे उज्वल निकम यांना एक प्रश्न देखील विचारण्यात आला. राजकारणात येणार का असं प्रश्न विचारल्यानंतर त्यावर बोलताना ते म्हणाले की, राजकारणात सध्या जी अस्थिरता आणि गढूळता आहे ती बघून राजकारणात येण्याचा सध्या माझा विचार नाही, योग्य वाटत नाही. पुढे उज्वल निकम म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागेल हे सध्या तरी सांगणे कठिण असलं तरी तो लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ज्या घटनापीठासमोर सुरू होती त्या घटनापीठातील काही न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. ही सुनावणी पूर्ण झाली असून आता त्यावर निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल लागण्याची अपेक्षा आहे.

 

महाराष्ट्रातातील राजकारणाला एक नाव रूप मिळाला आहे. दिनांक २० जून २०२२ रोजी झालेल्या महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर राजकारणात अनेक घटना घडल्या आहेत. तसेच १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाली.आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे लागलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. तसेच ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली, ते ५ न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. १३ आणि १४ मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे ८-१२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss