Friday, April 26, 2024

Latest Posts

MS Dhoni च्या गुडघ्यावर आज शस्त्रक्रिया पार पडणार?

भारताचा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा विजेतेपद पटकावले. २९ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पाहायला मिळाला.

भारताचा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा विजेतेपद पटकावले. २९ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला. त्यांनतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी यांच्या गुडघ्यावर आज शस्त्रक्रिया झाली आहे अशी माहिती समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा सिझन संपल्यानंतर धोनी रुग्णालयामध्ये दाखल झाला असे सांगण्यात आले आहे. धोनीची ३१ मे रोजी त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुंबईमधील किकोलाबेन रुग्णालयामध्ये तपासणीसाठी गेला होता.

काही सामन्यांमध्ये दिसून आले की, धोनीला यंदाच्या आयपीएलचा सिझन सुरु असताना गुडघे दुखापतीचा त्रास जाणवत होता. महेंद्रसिंह धोनी अनेकदा पाय खेचताना मैदानामध्ये दिसला होता. आयपीएल २०२३ चा हा संपूर्ण सिझन गुडघे दुखापतीचा त्रास धोनीने अंगावर काढल्याचे दिसून आले. चेन्नई सुपर किंग्सला ५ वे विजेतेपद मिळवूं देण्यासाठी तो मैदानामध्ये होता. चेन्नईच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर धोनीने रुग्णालयामध्ये जाऊन त्याच्या गुडघ्याची तपासणी केली.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये पहिल्याच सामन्यामध्ये खेळताना एमएस धोनीचा गुडघ्याचा त्रास जाणवला. १२ एप्रिल रोजी धोनीचा गुडघे दुखापतीचा रस सर्वांच्या लक्षात आला. धोनीच्या दुखापतीबद्दल चेन्नईचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग आणि बॅटिंग कोच माइक हसी यांनी वक्तव्य करून स्पष्ट केले. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये हे दिसून आले आहे. त्यामुळे तो बॅटिंगसाठी सुद्धा शेवटला येत होता.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss