Saturday, April 27, 2024

Latest Posts

अरविंद केजरीवालांचा ईडीवर गंभीर आरोप, हे एक राजकीय षडयंत्र..

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर केजरीवाल यांना कोर्टात नेल्यानंतर त्यांनी ईडीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ‘आप’ला चिरडण्यासाठी स्मोकस्क्रीन तयार करणे आणि खंडणीचे रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू आहे, असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच राघव रेड्डी यांनी भाजपला ५५ कोटींचे निवडणूक रोखे दिले असून त्यांनी जामीन विकत घेतल्या आहेत, असे देखील अरविंद केजरीवाल म्हणाले. तर ईडीकडून आता अरविंद केजरीवाल यांच्या यांच्या कोठडीत ७ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली असून न्यायालयाने ही मागणी मान्य केलेली नाही.

ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना कोर्टात हजर केल्यानंतर केजरीवाल म्हणाले, हे प्रकरण २ वर्षांपासून सुरू आहे. मला अटक करण्यात आली आहे. मला कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. सीबीआयने ३१,००० पानांचा अर्ज दाखल केला असून, २९० हून अधिक साक्षीदार तपासण्यात आले आहेत. ईडीने २०,००० हून अधिक पानांचा दावा दाखल केला आहे. माझे नाव फक्त ४ स्टेटमेंटमध्ये आलं आहे. हे सध्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी पुरेसे आहे का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, हे एक राजकीय षडयंत्र आहे, जनता त्याला चोख प्रत्युत्तर देईल. केजरीवाल यांनी दिल्ली एलजी व्हीके सक्सेना यांच्या ‘तुरुंगातून सरकार चालवू शकत नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. आज अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडी संपल्याने रोज एव्हेन्यू न्यायालयात हजर केले. रिमांडच्या सुनावणीसाठी आप नेते आतिशी आणि त्यांची पत्नी सुनीता देखील कोर्टरूममध्ये उपस्थित होते.

हे ही वाचा:

उन्हाळ्यात पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांसमोर, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss