Saturday, April 27, 2024

Latest Posts

LIC च्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

मागील वर्षांमध्ये आजच्या तारखेला म्हणजेच १ मे रोजी देशामध्ये सर्वात मोठा IPO (Initial public offering) बाजारामध्ये सूचीबद्ध झाला होता.

मागील वर्षांमध्ये आजच्या तारखेला म्हणजेच १ मे रोजी देशामध्ये सर्वात मोठा IPO (Initial public offering) बाजारामध्ये सूचीबद्ध झाला होता. हा IPO सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा होता. अडीच लाख कोटींचे रुपयांचे नुकसान एक वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचे झाले आहे. LIC कंपनीचे शेअर सध्या ९४९ रुपयांच्या इश्यू किमतीपासून ४० टक्क्यांच्या खाली ट्रेंडिंग करत आहे. त्यामुळे LIC च्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे LIC कंपनी आता सध्या बाजारामध्ये टॉप १० किंवा टॉप १५ च्या यादीमध्ये नाही. LIC या कंपनीने मागील वर्षांमध्ये सर्वाधिक मार्केट गॅप गमावले आहे.

मार्च शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार LIC मधील म्युच्युअल फंड होल्डिंग डिसेंबरमधील ०.६६ टक्क्यावरून मार्चमध्ये ०.६३ टक्क्यावर आली आहे. तिसऱ्या महिन्यामध्ये FII ची होल्डिंग देखील ०.१७ टक्के होती आणि तीच होल्डिंग चौथ्या महिन्यात ०.०८ टक्क्यावर आली. आता किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांचे स्टेक वाढवले आहेत. त्यांनी त्याची हिस्सेदारी १.९२ टक्क्यांवरून २.०४ टक्क्यांपर्यत वाढवली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे परंतु एलआयसीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये मोठी घट झाली आहे. एलआयसी कडे ३९.८९ लाख किरकोळ गुंतवणूकदार होते. LIC चा IPO देशासाठी अनेक अर्थानी महत्वाचा होता. त्याचा आकार २१ हजार कोटी रुपये होता आणि एवढा मोठा IPO यापूर्वी कधीच आला नव्हता.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss