Tuesday, June 6, 2023

Latest Posts

दुःखद बातमी, हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे निधन

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे बुधवारी १७ मे रोजी लंडनमध्ये निधन झाले. हे चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ बंधू होते. काही काळाच्या नंतर त्यांची तब्येत जास्त खराब झाली होती.

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे बुधवारी १७ मे रोजी लंडनमध्ये निधन झाले. हे चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ बंधू होते. काही काळाच्या नंतर त्यांची तब्येत जास्त खराब झाली होती. श्रीचंद परमानंद हिंदुजा हे ८७ वर्षाचे होते. हिंदुजा कुटूंबाचे कुलगुरू आणि त्यांचे भाऊ, गोपीचंद आणि प्रकाश यांच्यावर स्वीडिश बंदूक निर्माता एबी बोफोर्सला भारत सरकारचा करार मिळवून देण्यासाठी सुमारे SEK 81 दशलक्ष बेकायदेशीर कमिशन मिळवून देण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हिंदुजा कुटूंबामध्ये गोपीचंद, प्रकाश, अशोक हे त्यांचे तीन भाऊ आहेत. गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला आज आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा समुहाचे अध्यक्ष, श्री एसपी हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना दु:ख होत आहे असे त्यांच्या कुटूंबाच्या प्रवक्त्याने सांगितले. अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन झाले.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss