Wednesday, May 8, 2024

Latest Posts

ठाण्यातील कळवा पारसिक डोंगरावरील डी डॅम धरण हे ठाणे कळवा, मुंब्रा यांची भागवू शकतो तहान

ठाणे :- देशात प्रथम दहा क्रमाकात येणारी स्मार्ट सिटी असणारी ठाणे मनपा असून अत्यंत वेगाने या शहराचा विकास होत आहे. देशातील नागरिकांचं पसंतीच शहर म्हणून नावलौकिक मिळवत असल्याने ठाणे कळवा, मुंब्रा येथे लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे, मनपा मूलभूत सुखसुविधा पुरविण्याचा प्रयत्न ही करीत आहेत. पण ठाणे मनपाकडे स्वतंत्र पाणी धरण नसल्याने मनपाला मुंबई, MIDC यांच्या कडून जादा दराने पाणी विकत घ्यावे लागते असे म्हटलं जातं.

ठाणे :- देशात प्रथम दहा क्रमाकात येणारी स्मार्ट सिटी असणारी ठाणे मनपा असून अत्यंत वेगाने या शहराचा विकास होत आहे. देशातील नागरिकांचं पसंतीच शहर म्हणून नावलौकिक मिळवत असल्याने ठाणे कळवा, मुंब्रा येथे लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे, मनपा मूलभूत सुखसुविधा पुरविण्याचा प्रयत्न ही करीत आहेत. पण ठाणे मनपाकडे स्वतंत्र पाणी धरण नसल्याने मनपाला मुंबई, MIDC यांच्या कडून जादा दराने पाणी विकत घ्यावे लागते असे म्हटलं जातं. त्या उलट ठाणे मनपा नंतर उदयाला आलेल्या नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाइंदर व इतर काही मनपा ना स्वतःचे पाणी पुरवठा करणारे धरण आहे.त्यामुळे ठाणेकरांना जानेवारी महिन्या पासून जून पर्यंत कपात, पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.

भविष्यात ही समस्या वाढणार पण ठाणेकरांच्या या गंभीर समस्यावर पर्याय शोधला तर कळव्यातील पारसिक नगर डोंगरावर असणारे ब्रिटिश कालीन डी डॅम छोटे धरण म्हणून ओळखले जाणारे धरण होय. डी डॅम ची सद्यस्थिती जरी उत्तम नसेल पण त्याची दुरुस्ती केल्यास नक्कीच ठाणे, कळवा, मुंब्राकरांची तहान भागवेल यात शंका नाही. सदर धरण ब्रिटिश कालीन असून रबाले, नवी मुंबई मनपाच्या हद्दीत आहे पण आज राज्याचे प्रमुख, ठाण्याचे सुपुत्र, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असल्याने अपेक्षा वाढली असून स्थानिक त्यांचे तरुण, होतकरू,आक्रमक काहीतरी नवीन करणारे ,उच्च शिक्षित खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी जर सदर विषयावर इच्छाशक्ती दाखवत काम केले,पाठपुरावा केला तरडी डॅम ही ठाणे मनपाची स्वतंत्र पाणी पुरवठा धरण होणार यात शंका नाही. स्थानिक आमदार हेही या विषयी प्रयत्नशील असल्याचे म्हटलं जातं त्यामुळे कोणतेही राजकारण, हेवेदावे, बाजूला सारून ठाणेकरांना आपली सर्व ताकद मा. मुख्यमंत्री लावतील व ठाणेकरांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करतील अशी विनंती तहानलेला त्यांचाच ठाणेकर मा. मुख्यमंत्री यांना करतांना दिसत आहे.

हे ही वाचा : 

ऐरोलीत शाळेच्या विरोधात पालकांच्या तक्रारी

एकच परिवारात तीन पिढ्यांमध्ये समाजसेवेचा वारसा पहिल्यांदी बघितला – अमित शहा

शरद पवार अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय घडलं? राऊतांच्या दाव्याने राजकीय चर्चेला उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss