Tuesday, April 30, 2024

Latest Posts

महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र – आदित्य ठाकरे

राज्यातल्या राजकारणांमध्ये रोज काही तरी नवीन सत्रांचे राजकारण चालू आहे. पहिले म्हणजे राजकारणात केंद्र स्थानी अजीत पवार दिसत होते त्यानंतर काही दिवसांनी संपूर्ण राजकारण हे शरद पवार यांच्या भोवती गुंडाळलेले दिसून आले.

राज्यातल्या राजकारणांमध्ये रोज काही तरी नवीन सत्रांचे राजकारण चालू आहे. पहिले म्हणजे राजकारणात केंद्र स्थानी अजीत पवार दिसत होते त्यानंतर काही दिवसांनी संपूर्ण राजकारण हे शरद पवार यांच्या भोवती गुंडाळलेले दिसून आले. आणि आता तर नितेश राणे यांनी त्यांच्या रोजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेने सगळ्यांची सुरुवात करायची अशी जबाबदारी घेतली आहे. तर सध्याच्या स्थितीला आदित्य ठाकरे हे माथेरान दौऱ्यावर आहेत . त्यामुळे माथेरान दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध विषयावर माध्यमाशी चर्चा केली. महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आली आहे. जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील असं ते यावेळी म्हणाले आहेत.आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना कोकणात येऊन दाखवा असं जे आव्हान देण्यात आलं होतं त्या आव्हानाला आम्ही महत्त्व देत नाही. सभेला परवानगी नाकारणे ही तर हुकूमशाही आहे. हे सरकार तेथील नागरिकांवर दादागिरी करतात.मुळात प्रश्न हाच राहतो की, इतका चांगला प्रकल्प असेल तर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्याची काय गरज आहे? अनेक ठिकाणी ही हुकूमशाही आपल्याला दिसते. ही हुकूमशाहीची राजवट आहे असंही ते म्हणाले. शिंदे फडणवीस सरकार मध्ये सध्या हुकूमशाहीला सगळे घाबर त असल्याने हे सरकार कोणालाच मान्य नाहीये.

सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या चर्चा नाहीत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, आपलं राज्य अंधारात गेलं आहे. खूप सारे उद्योजक आपल्या राज्यात येत नाहीत, गुंतवणूक होत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये गुंतवणूक होत होती. महाविकास आघाडीच्या काळात शाश्वत विकास होत होता तसा आता होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे संविधान रक्षण हा आमचा महत्त्वाचा हेतू आहे आणि आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलेलो नाही. जसे गद्दार खुर्चीसाठी एकत्र येतात तसे आम्ही येत नाही. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

हे ही वाचा : 

LIVE उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

राजापुरात नितेश राणेंचं शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss