Wednesday, May 1, 2024

Latest Posts

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

बॉलीवूड मधील अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. सारा नेहमीच तिच्या सोशल मीडियावर फोटो आणि गमतीदार व्हिडीओ शेअर करत असते.

बॉलीवूड मधील अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. सारा नेहमीच तिच्या सोशल मीडियावर फोटो आणि गमतीदार व्हिडीओ शेअर करत असते. सारा कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असल्यावर ती तिच्या सोशल मीडियावर त्याबाबतीत फोटो किंवा व्हिडीओ शेअर काकरून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकताच सारा अली खान आणि विकी कौशलचा एक नवा चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विकी आणि साराने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. आता सारा अली खानने तिची आजी शर्मिला टागोरसोबत एक क्युट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने आजीसोबत शेअर केलेला व्हिडिओमध्ये त्या दोघीही एक जुन्या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत. साराने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. दोघेही सेटवर एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सारा अली खानने शर्मिला टागोरचा हात धरलेला दिसत आहे. सारा आजीच्या खांद्यावर डोके ठेवून आराम करताना दिसत आहे.

साराने शर्मिला टागोर म्हणजेच तिच्या आजीसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने कॅप्शन लिहिले आहे की, ‘स्पेशल डे’. या व्हिडीओला अनेक कमेंट्स आल्या आहेत. शर्मिला टागोर या काही दिवसांपूर्वी मनोज बाजपेयी, सिमरन, सूरज शर्मा आणि अमोल पालेकर यांच्यासोबत ‘गुलमोहर’मध्ये दिसल्या होत्या. १३ वर्षांनंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss