Sunday, April 28, 2024

Latest Posts

पुन्हा एकदा उर्वशी रौतेला झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

जगामधील सर्वात मोठा कान्स चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) सुरु आहे आणि या सोहळ्याला बॉलीवूडच्या कलाकारांनी आपली अदा दाखवली.

जगामधील सर्वात मोठा कान्स चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) सुरु आहे आणि या सोहळ्याला बॉलीवूडच्या कलाकारांनी आपली अदा दाखवली. कलाकारांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आतापर्यत ऐश्वर्या रॉय (Aishwarya Roy), सारा अली खान (Sara Ali Khan), मृणाल ठाकूर (Mrunal Thankur), मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), ईशा गुप्ता (Esha Gupta) यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे (Urvashi Rautela) नाव सामील झाले आहे. उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये उर्वशीने तिचा नारंगी रंगाचा ड्रेस घातला आहे. तो ड्रेस चाहत्यांना प्रचंड आवडला आहे आणि चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

उर्वशी त्या व्हिडिओमध्ये ती एका गाण्यावर डान्स करत आहे आणि अचानक तो ड्रेस खाली सरकल्याने दिसून आले आहे. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की काळ उर्वशी देखील भांबावून जाते आणि तिने पटकन स्वतःला सावरत तो प्रसंग टाळला आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर तिचे वर्तन पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की “तू कान्समध्ये गेली खरी पण त्याचे किती फोटो टाकणार आहे”. त्यांनतर तिचा एक हिरवी लिपस्टिक लावलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला होता त्यावर नेटकऱ्यांनी लिहिले होते की, “तू तर क्रिश ३ ची कंगना दिसते आहेत” अशा अनेक कमेंट्स करून तिची शाळा घेतली आहे.

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss