Monday, April 29, 2024

Latest Posts

जावई अन् लेकीसाठी परिणीतीच्या आईची भावुक पोस्ट

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पहिल्यांदा एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार राघव चढ्ढासोबत एंगेजमेंट केली आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पहिल्यांदा एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार राघव चढ्ढासोबत एंगेजमेंट केली आहे. या जोडप्याच्या एंगेजमेंट सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये परिणिती आणि राघवची एंगेजमेंट झाली. फायनली अभिनेत्री प्रणिती चोप्रा हि चड्डा कुटुंबाची सून झाली आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये चालणाऱ्या लोकांना त्यांच्या तर्कवितर्कांना त्याच्या नात्याबद्दल fullstop दिला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आम आदमी पार्टी’चे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीत संपन्न झाला. या सोहळ्याला बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. साखरपुडा झाल्याची माहिती दिल्यावर राघव-परिणीतीवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या नवीन जोडप्याला सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिल्यावर परिणीतीची आई ‘रीना चोप्रा’ यांनीही आपल्या लेकीसाठी आणि जावयासाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. परिणीती आणि राघव यांचा फोटो शेअर करीत ‘रीना चोप्रा’ लिहितात, “तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, ‘देव’ आहे यावर तुमचा विश्वास बसतो. आमच्या आयुष्यात आलेला हा सुंदर प्रसंग त्याचेच एक उदाहरण आहे. यासाठी मी देवाचे मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यासाठी मन:पूर्वक धन्यवाद!” ही भावुक पोस्ट शेअर करीत ‘रीना चोप्रा’ यांनी मुलीला आणि जावयाला आशीर्वाद दिले आहेत.

परिणीती आणि राघव चड्डा यांनी त्यांच्या साखरपुड्यासाठी सेम थीम ठेवण्यात आली होती . परिणीतीच्या आईने साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये राघव-परिणीतीसाठी संपूर्ण चोप्रा कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा खास भारतात आली होती. तिनेही आता आपल्या बहिणीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.दरम्यान, परिणीती शेवटची अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत सूरज बडजात्याच्या ‘उंचाई’ चित्रपटात दिसली होती. लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये परिणीती दिलजीत दोसांझबरोबर काम करणार आहे.

हे ही वाचा : 

एकनाथ शिंदे घेणार वाहनचालकांसाठी मोठा निर्णय

जयंत पाटील यांना ईडीने दिला दुसऱ्यांदा समज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss