Monday, April 29, 2024

Latest Posts

खतरों के खिलाडी १३ मध्ये झळकणार शिझान खान

शिझान खान (Sheezan Khan) गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. आता त्याची तुरूंगामधून सुटका झाल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा टेलिव्हिजन पडद्यावर कमबॅक करणार आहे.

शिझान खान (Sheezan Khan) गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. आता त्याची तुरूंगामधून सुटका झाल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा टेलिव्हिजन पडद्यावर कमबॅक करणार आहे. ‘अली बाबा : दास्तान ए काबुल’ (Ali Baba : Dastan E Kabul) या मालिकेमध्ये तो शेवटचा दिसला होता. रोहित शेट्टीचा फेमस शो खतरों के खिलाडी सिझन १३ (Khatron Ke Khiladi Season 13) लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आता शीझान खान खतरों के खिलाडी सिझन १३ मध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे. त्याच्यावर खलटा सुरु असल्याने तो भारताबाहेर प्रवास करू शकत नाही. त्यामुळे ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये सहभागी होण्यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल करत भारताबाहेर प्रवास करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

 

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व स्पर्धक खतरों के खिलाडी १३ शूटिंगसाठी अर्जेंटिनाला (Argentina) रवाना होणार आहेत. नायरा बॅनर्जी (Naira Banerjee), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thackeray), अंजुम फकीह (Anjum Faqih), रुही चतुर्वेदी (Ruhi Chaturvedi), अरिजित तनेजा (Arijit Taneja), अंजली आनंद (Anjali Anand), शरद मल्होत्रा (Sharad Malhotra), मुनावर फारुकी, प्रिन्स नरुला (Prince Narula) आणि अंजली अरोरा (Anjali Arora) हे स्पर्धक खतरों के खिलाडी १३ मध्ये सहभागी होणार आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’ शीझान खान कसा खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लवकरच ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss