Monday, April 29, 2024

Latest Posts

उन्हाळ्याच्या दिवसात झटपट बनवा स्ट्रॉबेरी मिल्कशेक

राज्यभरात काही प्रमाणात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.

राज्यभरात काही प्रमाणात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. अश्यावेळी आरोग्याची ,त्वचेची ,शरीराची काळजी घेणे फार गरजेचे असते. या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या खाद्यपदार्थांचा आणि पेयांचा आहारात समावेश करणे फार गरजेचे आहे. ताक, दही, ज्यूस, लिंबू पाणी, फ्रेश लाईम सोडा, कैरीचे पन्हे, विविध प्रकारचे मिल्कशेक, आईसक्रीम या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करा. या दिवसांमध्ये ताज्या स्ट्रॉबेरीपासून विविध प्रकारचे ज्यूस, लस्सी, आईसक्रीम, केक आणि मिल्कशेक बनवले जातात. तुम्ही सुद्धा ताज्या स्ट्रॉबेरीपासून मिल्कशेक बनवू शकता. चला तर पाहुयात रेसिपी..

साहित्य:-

स्ट्रॉबेरी (१० ते १५)
१ कप दूध
बर्फाचे तुकडे
साखर
मीठ

कृती:-

सर्वप्रथम स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी बारीक चिरून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये १ कप थंड दूध टाकून घ्या. त्या दुधात स्ट्रॉबेरी, साखर घाला. नंतर त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यामध्ये बर्फाचे तुकडे घाला. आवश्यकतेनुसार तुम्ही बर्फाचे तुकडे टाकू शकता. त्यानंतर मिल्कशेक एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. एका मोठ्या ग्लासमध्ये हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक काढा आणि स्ट्रॉबेरीच्या तुकड्यानी सजवून घ्या. तयार आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक.

हे ही वाचा:

पुण्यात वॉशिंग मशिन नकोच,माझंही मत तेच आहे; संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी केले विधान

७ तास थांबून विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss