Saturday, April 27, 2024

Latest Posts

होळीनिमित्त देशभरातील बाजारपेठेत चिनी वस्तूंवर बहिष्कार

देशभरात सगळीकडे होळी सणाचा उत्साह आहे.

देशभरात सगळीकडे होळी सणाचा उत्साह आहे. वेगवेगळ्या रंगानी बाजारपेठा सजल्या आहेत. देशभरात एका बाजूला राजकीय होळी साजरी केली जात आहे तर दुसऱ्या बाजूला होळीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, होळी सणानिमित्त चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा अनेक ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी लोक देशी वस्तूंना प्राधान्य देताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहक देखील यावर बहिष्कार घालत आहेत.होळी सणानिमित्त देशात साधारणत: १० हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात करण्यात आली आहे. यंदा बाजारपेठेत चांगले वातावरण आहे. होळीच्या सणानिमित्त लोक मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करतात. यामध्ये हर्बल रंग, गुलाल, पिचकारी, चंदन, फुगे, पुजेचं साहित्य, कपडे, मिठाई, भेटवस्तू, फुले, फळे, किराणा माल यासह देशात उत्पादीत झालेल्या विविध वस्तूंची खरेदी लोकांकडून केली जात आहे. या सर्व वस्तुंना बाजारात मोठी मागणी आहे. ही खरेदी करत असताना लोक परदेशी वस्तू घेण्यास नकार देत आहेत. देशी वस्तूंनाच अधिक प्राधान्य दिले जात आहे. सध्या बाजारात पिचकारीची किंमत ही १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आहे. लहान मुलांना ज्या प्रकारच्या वस्तू आवडतात तशाच वस्तू बाजारात तयार केल्या आहेत.उद्या देशभरात सगळीकडे होळी सणाचा आनंद असणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मार्केट सज्ज झाले आहे. बाजारपेठात मोठ्या प्रमाणात साहित्य आल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. देशभरातील व्यवसायात ५० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

आपले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी…Piyush Goyal यांचा हल्लाबोल

झुंडशाही,पवार पर्व संपवण्यासाठी आपली लढाई – विजय शिवतारे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss