Saturday, June 3, 2023

Latest Posts

धूम्रपानाच व्यसन लागलाय? ही बातमी नक्की वाचा…

आतापर्यंत संशोधकांनी आणि शास्त्रज्ञानी धूम्रपानाचे अनेक दुष्परिणाम सांगितले आहेत. नुकताच धूम्रपानाचे धक्कादायक निष्कर्ष संशोधकांसमोर आले आहे.

आतापर्यंत संशोधकांनी आणि शास्त्रज्ञानी धूम्रपानाचे अनेक दुष्परिणाम सांगितले आहेत. नुकताच धूम्रपानाचे धक्कादायक निष्कर्ष संशोधकांसमोर आले आहे. धूम्रपानाचा मेंदूवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो असे यात समोर आले आहे. धूम्रपान केल्यामुळे शरीरावर गंभीर (side effects on body) दुष्परिणाम होतात. तसेच काही वेळेस जीवघेणी परिस्थितीही उद्भवू शकते. धूम्रपान केल्याने श्वसनसंस्था, रक्ताभिसरण, प्रजनन यंत्रणा, त्वचा, डोळे यांवर वाईट परिणाम होतो. यामुळेच धूम्रपान करणे ही अत्यंत वाईट सवय समजली जाते. असे म्हटले जाते की, धूम्रपान केल्यामुळे मधुमेहाचा (diabetes) त्रास वाढू शकतो. तसेच आरोग्यासंदर्भातील इतर समस्याही उद्भवू शकतात.सध्याच्या काळात धूम्रपान, मद्यपान ही फॅशन झाली आहे. यामुळे आरोग्य बिघडू शकतं याकडे दुर्लक्ष केलं जाते. परंतु आता यावर लक्ष देणे गरजेचे आहे. रोज धूम्रपान केलं असता मेंदूचा आकार लहान होऊ शकतो, असं नवीन संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे तातडीने धूम्रपान थांबवणं गरजेचे आहे.

नवीन संशोधनानुसार, रोज धूम्रपान करणाऱ्यांचा मेंदू कधीही धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा ०.४ क्युबिक इंच लहान असतो. यासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमधील लोकांच्या मेंदूच्या स्कॅनचे आणि त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीचे विश्लेषण केलं. या संशोधनात सहभागींचे २००६ ते २०१० आणि २०१२ ते २०१३ दरम्यान सर्वेक्षण केले गेले. दुसऱ्या टप्प्यात त्यांचा एमआरआय करण्यात आला. ज्या लोकांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही त्यांच्या मेंदूचा आकार सामान्य असल्याचे एमआरआय चाचणीतून दिसून आले. या चाचणीत धूम्रपान करणाऱ्यांच्या मेंदूचा ग्रे भाग ०.३ क्युबिक इंच तर व्हाइट भाग ०.१ क्युबिक इंच कमी झाल्याचे दिसून आले आहे.

आपल्या मेंदूचा ग्रे भाग हा भावना, स्मरणशक्तीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तर पांढरा भाग माहिती हस्तांतरणाचे काम करतो. नियमित धूम्रपानाच्या सेवनामुळे मेंदूच्या संकुचिततेवर तीव्र परिणाम झाल्याचे दिसून आले. पण ज्यांनी ही सवय सोडली त्यांच्या मेंदूच्या वस्तुमानात उलटी घट झाली. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील ग्रे भागात ०.००५ क्युबिक इंचाने वाढ होते, असं मेडरिस्कच्या संशोधनात दिसून आले.अद्याप समवयस्क व्यक्तींचे यासंदर्भात पुनरावलोकन करण्यात आलेले नाही.दरम्यान, सेलेब्रल अ‍ॅट्रॉफी अर्थात मेंदू संकुचित होणं ही क्रिया वयापरत्वे होत असते. त्याची काही लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात. यात स्नायूंवरील नियंत्रण जाणं, दृष्टी अंधूक होणं, दिशाहिनता, स्नायू अशक्त होणं, अल्झायमर विकार होणं, समन्वयाचा अभाव या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे धूम्रपानाचे व्यसन सोडणे गरजेचं आहे. यामुळे मेंदूशी संबंधित विकारांचा धोका कमी होऊ शकतो.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss