Saturday, June 3, 2023

Latest Posts

अंगाला खूप Sweat येतोय ? आजमावा ‘हे’ रामबाण उपाय

जास्त उष्णतेमुळे आपला जीव कासावीस होतो. शरीर थंड राहण्यासाठी आपण अनेक विविध उपाय करतो. अतिउष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. तसेच शरीरातून प्रचंड प्रमाणात घाम निघतो.

जास्त उष्णतेमुळे आपला जीव कासावीस होतो. शरीर थंड राहण्यासाठी आपण अनेक विविध उपाय करतो. अतिउष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. तसेच शरीरातून प्रचंड प्रमाणात घाम निघतो. घामामुळे शरीराला खाज येणे तसेच जळजळ होणे अश्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर जास्त घाम आल्यामुळे आपली प्रचंड प्रमाणात चीड चीड होते. तसेच आलेला घाम सुकल्यानंतर अंगाला तीव्र दुर्गंधी येते व मोठ्या प्रमाणात खाज सुद्धा येते. चला तर मग नेमके काय केल्याने आपल्याला जास्त घाम येणार नाही व घामामुळे शरीराला येणारी खाज ही कमी होईल.

घामामुळे येणाऱ्या घामोळ्यां तसेच खाजे कडे दुर्लक्ष केल्याने आपल्यापासून दुसऱ्यांना सुद्धा संसर्ग होऊ शकतो. तीव्र उष्णेतेमुळे येणाऱ्या घामामुळे अनेक स्किन प्रोब्लेम्स ही होऊ शकतात. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. घामामुळे होणारी त्वचेची खाज कमी होण्यासाठी आम्ही आज काही घरगुती उपाय आपल्या साठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात नेमके काय केल्याने त्वचेची खाज कमी होईल.

कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे –

जर शरीराला घामामुळे खाज येत असेल तर कडुलिंबाचे पाने पाण्यात टाकून अंघोळ करावी. कडूलिंबात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-फंगल ही सत्व मोठ्या प्रमाणात असतात. या सत्वांमुळे शरीरातील खाज येण्याची समस्या दूर होते. कडुलिंबाचे पाने पाण्यात टाकून अंघोळ केल्याने पुरळ, त्वचेवर फंगस येणे या सुद्धा समस्या दूर होतात.

खोबरेल तेलाने मसाज करावी –

अनेक लोकांची स्किन कोरडी असल्यामुळे शरीराला खाज येण्याची समस्या निर्माण होते.अशावेळेस पूर्ण शरीराला नारळाच्या तेलाने मसाज करावी तसेच त्वचेला मॉइश्चरायझ ठेवावे. असे केल्याने त्वचेवर खाज येण्याची समस्या नाहीशी होते. तसेच नारळाच्या तेलाने नियमित मसाज केल्याने आपली त्वचा उजळते सुद्धा. खाज कायमची घालवण्या साठी आठवड्यातून दोनदा नारळाच्या तेलाने मसाज करावी.

सैल कपडे घालावे –

अनेकदा ताइट कपडे घातल्या मुळे शरीरावर खाज येते. अशा वेळेस तीव्र उष्णतेत लूज कपडे घालावे. यामुळे आपल्याला कमी घाम येईल व आपल्या शरीराला येणारी खाज ही नाहीशी होईल.

शरीराला आतुन थंड ठेवावे –

शरीरात हिट वाढल्याने देखील आपल्या त्वचेवर अनेक समस्या उद्भवतात. यामुळे शरीर थंड ठेवणे गरजेचे आहे. शरीर थंड ठेवण्यासाठी थोडया थोड्या वेळानी थंड सरबताचे सेवन करावे, तसेच विविध फळ खावे.

कोरफडीचा वापर करावा –

शरीराला आलेल्या खाजे पासून सुटका मिळवण्या साठी कोरफड वापरावे. कोरफड आपल्या त्वचे साठी थंड तसेच फायदेशीर असते. शरीराला आतून थंडावा मिळण्यासाठी कोरफडीचा ज्यूस आपण पिऊ शकतो.

हे ही वाचा:

कंगनाने घेतली शॉर्ट घालून मंदिरात गेलेल्या मुलीची शाळा

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही, राधाकृष्ण विखे पाटील

MI vs GT, फायनलचे तिकीट कोणाला मिळणार? मुंबई की गुजरात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss