Friday, April 26, 2024

Latest Posts

हे कायमस्वरूपी उपाय करून डार्क सर्कल वर करा मात

आजकालच्या तरुणाई मध्ये डार्क सर्कल (Dark circle) ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. डार्क सर्कल तशी काही गंभीर समस्या नाही. डार्क सर्कल हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करते. डार्क सर्कल म्हणजे आपल्या डोळ्याखाली काळ्या रंगाचे वर्तुळ निर्माण होते.

आजकालच्या तरुणाई मध्ये डार्क सर्कल (Dark circle) ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. डार्क सर्कल तशी काही गंभीर समस्या नाही. डार्क सर्कल हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करते. डार्क सर्कल म्हणजे आपल्या डोळ्याखाली काळ्या रंगाचे वर्तुळ निर्माण होते. त्यामुळे ते आपल्या चेहऱ्यावर चांगले दिसत नाही. ज्या व्यक्तींचा चेहरा उजळ असतो त्यांच्यावर तर हे डार्क सर्कल अजूनच स्पष्ट दिसून येतात. हे डार्क सर्कल निघून जाण्यासाठी आपण विविध उपाय करतो परंतु तरीही आपल्याला हवा तसा परिणाम दिसत नाही. असे केमिकल्स (Chemical) असलेले प्रोडक्टस (Products) वापरून डार्क सर्कल कायमचे जात नाही. डार्क सर्कल पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आपण नैसर्गिक उपायच केले पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया हे नैसार्गिक उपाय.

योग्य प्रमाणात झोप:

धकाधकीच्या जीवनात रोजचे जागरण आणि त्याच्या जोडीला थकवा ही डार्क सर्कल येण्यामागे प्रमुख कारणे आहेत. अपुऱ्या झोपेच्या अभावामुळे आपल्या डोळ्या खाली डार्क सर्कल्स येऊन आपले सौंदर्य बिघडते. आपल्या शरीरासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही दररोज सात ते आठ तासांची व्यवस्थित झोप घेतली तर तुमच्या डोळ्या खाली असलेले डार्क सर्कल निघून जातील आणि पुन्हा कधी ते तुमच्या चर्येवरील सौंदर्य बिघडविण्यासाठी येणार नाहीत.

सूर्यप्रकाश:

सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी फार गरजेचा असतो. सकाळचा ८ ते ११ मधला सूर्यप्रकाश हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी (Vitamin D) मिळते. हे व्हिटॅमिन आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. परंतु तुम्ही दुपारच्या उन्हात बाहेर पडलात तर त्याने तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स येऊ शकतात. कारण दुपारचे ऊन हे अतिशय कडक असते म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरते.

काकडी:

काकडी ही शरीरासाठी थंड असते त्यामुळे ती आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. तुम्ही काकडी कापून तुमच्या चेहऱ्यावर असलेल्या डार्क सर्कल्स वर साधारण १० मिनिटे ठेऊन द्या. आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. असे आठवड्यातून किमान ३ किंवा ४ वेळा केल्यास तुम्हाला फरक जाणवेल.

टी बॅग्स:

टी बॅग्स (tea bags) चा दुसरा उपयोग हा डार्क सर्कल घालविण्यासाठी केला जातो. सर्वप्रथम तुम्ही कॅफिनेटेड टी बॅग्स या गरम पाण्यात टाका आणि नंतर फ्रिजमध्ये काही वेळ थंड करत ठेवा. फ्रिजमधून काढल्यावर टी बॅग्स डोळ्यांवर ठेवा. साधारण ४ मिनिटे तुम्ही या टी बॅग्स डोळ्यांवर ठेवली पाहिजेत. ४ मिनिटे झाल्यावर या टी बॅग्स डोळ्यांवरून काढून त्या थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

हे ही वाचा : 

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss