Monday, April 29, 2024

Latest Posts

जास्तवेळ लिपस्टिक टिकून राहण्यासाठी ‘या’ काही खास टिप्स

महिलांसाठी लिपस्टिक (lipstick) हा आवडीचा मेकअप प्रॉडक्ट आहे.

महिलांसाठी लिपस्टिक (lipstick) हा आवडीचा मेकअप प्रॉडक्ट आहे. लिपस्टिक लावल्यानंतर सौंदर्य अधिक खुलून दिसत.हो की नाही? वेगवेगळ्या साडी आणि ड्रेस घातल्यानंतर महिलांना लिपस्टिक लावायला आवडत. आजकाल बदलत्या काळानुसार सौंदर्याचे ट्रेंड रोज बदलत आहेत. नवनवीन मेकअप प्रॉडक्ट बाजारत आले आहे.पण काही गोष्टी तश्याच पद्धतीने वापरल्या जातात. बदलत्या मेकअप प्रॉडक्ट बरोबर मेकअप करण्याची पद्धत देखील बदली आहे. काही महिला जास्त मेकअपपेक्षा लिपस्टिकच लावणं पसंद करतात. पण लिपस्टिक लावताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.जेणेकरून ओठांचा आकार आणि रंग बदलणार नाही.जास्तकाळ ओठांवर लिपस्टिक टिकून राहावी म्हणून काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

लिपस्टिक मध्ये २ प्रकार जास्त आवडीने वापर जातात. लिक्विड आणि क्रेयॉन यांचा वापर केला जातो. जर जास्तकाळ लिपस्टिक ओठांवर टिकून राहावी तर बेस्ट लिक्विडलिपस्टिकचा वापर करावा. ही लिपस्टिक क्रेयॉनपेक्षा जास्तकाळ टिकून राहते.

लिपस्टिक जास्तकाळ टिकून राहावी म्हणनू applicator च्या साहाय्याने लिपस्टिक ओठावर लावावी. लिपस्टिक लावल्यानंतर त्यांना एकत्र चोळू नये. ३० सेकंद तरी पूर्णपणे कोरडे होऊ द्यावी. तसे केल्यास जास्तकाळ लिपस्टिक टिकून राहते. लिपस्टिकचे योग्य शेड निवडण्यासाठी त्वचेच्या टोनची काळजी घेणे महत्वाचे आहे.आजकाल बाजारात नवनवीन ब्रँड येत आहेत.

ब्रँड बरोबरोबरच लिपस्टिकचा टेक्सचर समजून घेणं महत्वाचे आहे. जास्तीजास्त चांगल्या ब्रँड ची लिपस्टिक निवडणं गरजेचं आहे. लिपस्टिकमध्ये कमी प्रमाणात रसायन असतील आणि ओठांना हानी होणार नाही असे लिपस्टिक ब्रँड वापरले पाहिजेत. नैसर्गिक घटकांपासून बनवलेली ब्रँड लिपस्टिक वापरल्याने ओठांना त्रास होत नाही.

हे ही वाचा:

उन्हाळ्यात बनवा थंडगार आणि पित्तशामक सोलकढी

‘चोली के पीछे क्या है’ करीनाच्या गाण्याला प्रेक्षकांची नापसंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss