Monday, April 29, 2024

Latest Posts

उन्हाळ्यात बनवा थंडगार आणि पित्तशामक सोलकढी

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.सगळ्यांना थंड पदार्थ खूप आवडतात. या दिवसांमध्ये थंड पदार्थ शरीराला थंडावा देतात. दही,ताक,लिंबाचा रस,कैरीचं पन्ह इत्यादी पदार्थांच्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे .सोलकढी या पेयाचा उपयोग जास्तीत जास्त कोकणात केला जातो. या सोलकढी साठी लागणारे साहित्य हे घरात सहज उपलब्ध होते. सोलकढी ही मांसाहारी जेवणासोबत बनवली जाते. पण काही लोक ही आवडीने रोजच्या आहारात समावेश करतात. चला तर पाहुयात सोलकढी कशी बनायची रेसिपी…

साहित्य:-
१ . नारळ
२. कोकमचे आगळ
३. हिरवी मिरची
४. लसूण
५. आला
६. मीठ
७. जिरे
८. कोथिंबीर

कृती:-

आपल्याकडे जर कोकमाचा आगळ नसेल तर आपण कोकम पाण्यामध्ये भिजत ठेवाचे. कोकम चांगल्या प्रकारे भिजल्यानंतर ते पाणी आपण सोलकढीसाठी कोकमचा आगळ म्हणुन वापरू शकतो. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाच्या खोबऱ्याचा किस,हिरवी मिरची,आला,कोकमाचा आगळ, त्यानंतर ते मिक्सर मधले मिश्रण त्या कपड्यावर टाका आणि त्याचा रस काढून घ्या. नंतर पुन्हा एकदा ते मिश्रण मिक्सरला लावून तसेच रस काढून घ्या. नंतर रस काढून झाल्यावर त्यात हिरवीगर कोथिंबीर घालून सर्व करा .

हे ही वाचा:

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष – खासदार संजय राऊत

राजकीय हालचालींना वेग, BRS सोबत प्रकाश आंबेडकरांची बोलणी सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss