Thursday, June 1, 2023

Latest Posts

छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा इशारा, Gautami ने महाराष्ट्राचा

राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे याने आज गौतमी पाटीलवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. आता गौतमी इतकी फेमस झाली आहे की , तिचे नृत्य ठेवल्याशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. परंतु आता गौतमीवर देखील जोरदार टिका ही करण्यात आली आहे. राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे याने आज गौतमी पाटीलवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर घन:श्याम दराडे यांने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्याने गौतमीवर चांगलाच हल्लबोल हा केला आहे. यापूर्वी देखील घनश्याम याने गौतमी हिच्यावर टीका केली होती. परंतु आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत असल्याचे घन:श्याम दराडेने म्हणत गौतमीने देखील आपला मुसंडी चित्रपट पाहावा असे आवाहन केले. मात्र लावणीला बदनाम करून महाराष्ट्राचा बिहार करायचा प्रयत्न केल्यास आपण मुसंडी मारू असा इशाराही त्याने दिला.

तसेच ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माझे खूप वेगळे नाते असल्याचे सांगत दादा कधीही प्रवाहात गटांगळ्या खाणारे नेते नाहीत, असेही दराडेने म्हटले. अजित पवार हे शरद पवार यांना कधीही सोडून जाणार नाहीत. उलट राष्ट्रवादी जसा शरद पवार यांचा आहे, तसाच अजितदादांचाही पक्ष असल्याचे घनश्याम याने सांगितले. उलट दादा आता जनतेच्या आशीर्वादाने मुख्य खुर्चीवर मुसंडी मारतील असेही त्याने सांगितले.

हे ही वाचा : 

करिअरमध्ये आईची भक्कम साथ…, सईने सांगितलं आईसोबतचे नातं

क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण डीके शिवकुमार की सिध्दरमैया? दिल्लीत फैसला | Karnataka Election 2023

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss