Saturday, April 27, 2024

Latest Posts

SBI मध्ये दरोडा! तब्बल १७ लाखांच्या रोकडसह ३ कोटींचं लुटले सोनं

राज्यातील जळगाव मधून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काल दिनांक १ जून रोजी जळगावमध्ये (Jalgaon) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत भर दिवसा दरोडा पडला आहे.

राज्यातील जळगाव मधून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काल दिनांक १ जून रोजी जळगावमध्ये (Jalgaon) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत भर दिवसा दरोडा पडला आहे. दोन दरोडेखोरांनी हेल्मेट घालून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक व्यवस्थापकावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला करून दरोडेखोरांनी तब्बल १७ लाख रुपयांची रोख रकमेसह ३ कोटी रुपयांचे सोनंही लुटून नेलं. त्याचसोबत कोणताही पुरावा मागे न ठेवण्याचं काम देखील त्यांनी केले आहे. म्हणजेच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा (CCTV Camera) डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवला आहे. त्यामुळे आता आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.

काल दिनांक १ जून २०२३ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये सकाळी बँक उघडताच दरोडा पडला. कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला. गोल्ड लोनसाठी बँकेतील लॉकरमध्ये असलेले तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने आणि १७ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. दोन दरोडेखर यांनी मॅनेजर राहुल महाजन यांच्यावर चाकूने वार करत त्यांना जखमी केलं. परंतु आता या घटनेमुळे संपूर्ण जळगावात भीतीचे वातावरण हे पसरले आहे.

दरोडेखोरांनी हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत केला. चोरटे बँकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतची थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यांनी बँकेतील १७ लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच संपूर्ण नियोजन करून चोरटयांनी हा दरोडा टाकला आहे. तसेच आपली कोणतीही ओळख पटू नये यासाठो चोरटयांनी डोक्यात हेल्मेट घातलं होतं. तसेच कोणतंही पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा (CCTV Camera) डीव्हीआर देखील पळवला आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss