Wednesday, May 1, 2024

Latest Posts

मी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाण्यातील जुना कार्यकर्ता – Jitendra Awhad

आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी मुख्यमंत्र्यांनी मुलाची उमेदवारी जाहीर करणे टाळले असेल, असे मत माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. बैठकीबाबत  जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाणे आणि कल्याण या दोन्ही उमेदवारांनी भेट घेतली याचे मुख्य कारण; मी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाण्यातील जुना कार्यकर्ता आहे. शेवटी आघाडी आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत त्यासाठी एकमेकांच्या भेटीगाठी होणे गरजेचे आहे. महायुतीची उमेदवारी कोणी जाहीर करावी, हा त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी मुलाची उमेदवारी जाहीर करणे एखाद्या वेळी टाळले असेल. असे आव्हाड म्हणाले. भाजपबद्दल जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणी नाकारू शकत नाही, परिणाम काय होतात ते सांगू शकत नाही. अजून निवडणुकीला ४४ दिवस बाकी आहेत. इतके दिवस आधी काही सांगू शकत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यानंतर राजन विचारे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राजन विचारे यांना स्पर्धक नाही, तळा-गाळात पोहचलेला तो माणूस आहे. त्यांनी प्रचारात खूप आघाडी घेतली आहे. सहानुभूतीची लाट राजन विचारेंबरोबर असल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राजन विचारे यांचे कौतुक केले.

वैशाली दरेकर यांची भेट 

दरम्यान, कल्याण लोकसभेच्या शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार, वैशाली दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देत, ताकदीने सोबत असल्याची ग्वाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) ज्येष्ठ नेते राजन विचारे, केदार दिघे, वरुण सरदेसाई, ऋता आव्हाड, सुहास देसाई, विक्रम खामकर आणि इतर सहकारी उपस्थित होते.

कल्याणच्या जागेवर महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून वाद होते. या जागेवर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी हक्क सांगितला होता. त्यामुळे, महायुतीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करत सांगितले, “कल्याणच्या जागेवर महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे असतील. भारतीय जनता पक्षाकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाला अजिबात विरोध नाही भारतीय जनता पक्ष श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. आमही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने ते यावेळी निवडून येतील. आम्ही महायुतीतील सर्व घटकपक्ष त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत”, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

खासदाराने कसे काम करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Dr. Shrikant Shinde Suryakumar Yadav चे MI मध्ये कमबॅक.. ‘ह्या’ प्लेअर्सना बसावे लागेल बाहेर Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss