Friday, April 26, 2024

Latest Posts

Mhada Konkan मंडळाच्या घरासाठी आज सोडत

सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अनेकजण प्रतिक्षीत असणारी म्हाडाच्या घराची लॉटरी अखेर आज कोकण विभागासाठी लॉटरी खुली करण्यात आली आहे.

सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अनेकजण प्रतिक्षीत असणारी म्हाडाच्या घराची लॉटरी अखेर आज कोकण विभागासाठी लॉटरी खुली करण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या एकूण ४ हजार ६४० घरे आणि १४ भूखंडांसाठी आज ठाण्यात सोडत होणार आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात ही सोडत होणार आहे. म्हाडाच्या या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण विभागाने ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या घरांसाठी ही सोडत होणार आहे. सोडतीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. एकूण ४९ हजार १७४ अर्ज हे पात्र ठरले आहेत. आज म्हाडा कोकण मंडळाची संगणकीय सोडत होणार आहे. या सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे सोयीचे नियोजन करण्यात आले आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीसाठी दिनांक ८ मार्चपासून नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. या स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्या यादीनुसार आता ४९ हजार १७४ अर्ज सोडत प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी ३५१ अर्ज, २० टक्के सर्वसमावेश योजनेसाठी ४६ हजार १६ अर्ज, म्हाडाच्या घरांसाठी २ हजार ४३८ अर्ज आणि प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी ३६९ अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विरार बोळिंज येथील २ हजार ४८ सदनिकांचा समावेश असून अनामत रकमेसह ३६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्याने सदनिका वितरित केली जाणार आहे.

‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही bit.ly/konkan_mhada या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएस (SMS) द्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती कळवली जाणार आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर सूचना पत्र पाठवले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठवले जाणार आहे.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss