Tuesday, May 30, 2023

Latest Posts

CSK vs GT, कोणता संघ जाणार अंतिम फेरीत? कोण ठरणार वरचढ

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier League 2023) मध्ये आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier League 2023) मध्ये आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आजचा हा सामना चेन्नईमधील चपोक स्टेडियमवर (Chapok Stadium) खेळवला जाणार आहे. आज हा सामना संध्याकाळी ७.३० ला सुरु होणार आहे. आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेमध्ये १४ पैकी दहा सामने जिंकून गुजरात टायटन्सच्या संघाने अव्वल स्थान मिळवले आहे. तर १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकून गुणतालिकेमध्ये २ स्थानावर विराजमान आहे. आज एमएस धोनी (MS Dhoni) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आमनेसामने असणार आहेत.

चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघांमध्ये विजयी झालेला संघ अंतिम फेरीचा सामना खेळेल आणि पराजीत झालेला संघ क्वालिफायर २ चा सामना खेळेल. क्वालिफायर २च्या (Qualifier 2) आधी एक एलिमिनेटर (Eliminator) सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गुणतालिकेमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणारे संघ हा सामना खेळणार आहेत. आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांची रणनीती काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. चार वेळा आईपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स ला आयपीएलच्या इतिहासामध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स विरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही.

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग ११
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिषा तीक्षणा

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग ११
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, दासून शनाका, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss