Friday, April 26, 2024

Latest Posts

IPL2023, आज खेळणार चेन्नई आणि गुजरात क्वालिफायर १

भारतामध्ये सर्वच क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करणारी आणि आवडणारी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League). आज इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये क्वालिफायर १ (Qualifier 1) खेळवली जाणार आहे.

भारतामध्ये सर्वच क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करणारी आणि आवडणारी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League). आज इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये क्वालिफायर १ (Qualifier 1) खेळवली जाणार आहे. सर्वच संघानी कसून मेहनत करून काही संघाना यश मिळाले तर काही संघाना पराभवाचा सामना करावा लागला. आजचा हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आज या दोन्ही संघांमध्ये जो संघ जिंकेल तो संघ डायरेक्ट फायनलचा सामना खेळणार आहे.

आज हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ मिळवण्याच्या हेतूनेच मैदानात उतरतील. आजचा सामना चेन्नईमधील चेपॉक मैदानावर (Chepauk Stadium) खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२३ चा हंगाम हा अत्यंत रोमांचक झाला. प्लेऑफ साठी शेवटच्या सामन्यापर्यत संघांची लढत सुरु होती. आजचा हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. त्यांनतर २४ मे रोजी एलिमिनेटर सामना रंगणार आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना एम चिदंबरम स्टेडियम या मैदानात होणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघांमध्ये खेळवला जाणारा एलिमिनेटर सामन्यात जिंकलेला संघ क्वालिफायर २ खेळणार आहे. एलिमिनेटर सामन्यामध्ये विजेता संघ क्वालिफायर १ मध्ये पराभव झालेल्या संघासोबत खेळणार आहे. आयपीएल २०२३ चा शेवटचा फायनलचा सामना गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss