Saturday, June 3, 2023

Latest Posts

RCBvsDC, कोण हुकणार प्लेऑफपासून आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आज दोन सामने होणार आहेत. आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कपिटल्स (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आज दोन सामने होणार आहेत. आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कपिटल्स (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएल २०२३ च्या स्पर्धेमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळत आहे. अजूनही कोणत्याही संघाचे काहीच ठरलेले नाही. एक हार जीत अख्ख्या गुणतालिकेची स्थिती बदलवू शकते अशी स्थिती सध्या सुरु आहे. त्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामधील सामना पावसामुळे रद्द झाला या लढतीचा थेट परिणाम गुणतालिकेवर परिणाम दिसून आला. त्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाना एक एक गुण देण्यात आला.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या सामन्यांमध्ये आज अशीच स्तिथी या दोन संघांमध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु हा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे. परंतु हवामान खात्याच्या अंदाजामुळे सर्व गणित फिस्कटेल आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे. १६ किमी वेगाने वारे वाहत आहेत. तापमान २६ ते ४१ डिग्री सेल्सियसपर्यंत एवढे राहणार आहे.

आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाना प्लेऑफसाठी हा विजय अत्यंत महत्वाचा आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचे नुकसान होणार आहे. विशेषतः दिल्ली कॅपिटल्सच्या आशा पूणपणे संपुष्टात येतील. गुणतालिकेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्याचा काही निकाल लागला तर बंगरुळुच्या संघाला नुकसान होईल. कारण जर मुंबई जिंकली तर १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर जाईल जर चेन्नई सुपर किंग्स जिंकली तर १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असेल. त्यामुळे बंगळुरुला मोठा फटका बसू शकतो.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss