Saturday, June 3, 2023

Latest Posts

परदेशी किली पॉल आणि त्याची बहिण थिरकली बॉलीवूड ट्रेंडवर

इंस्टाग्रामवर (Instagram) रोज नेटकऱ्यांना काही नवनवीन पाहायला मिळतं. नेटकरी दिवसातला बराच वेळ इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स (Trending Reels) बघण्यात घालवतात.

इंस्टाग्रामवर (Instagram) रोज नेटकऱ्यांना काही नवनवीन पाहायला मिळतं. नेटकरी दिवसातला बराच वेळ इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स (Trending Reels) बघण्यात घालवतात. सध्या इंस्टाग्रामवर ट्रेण्डिंग असलेल्या एका परदेशी जोडीचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारी जोडी म्हणजे टांझानियाचे (Tanzania) किली पॉल (KILI PAUL ) आणि नीमा पॉल. बॉलीवूड गाण्यावर रील करणाऱ्या या जोडीने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. नेटकऱ्यांचा या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स मिळत असून कॉमेंट्सचा ही वर्षाव होत आहे.

प्रत्येक वेळी नवनवीन व्हिडीओ करणाऱ्या या जोडीचे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात फॅन्स कमावले आहेत. नुकत्याच टाकलेल्या व्हिडीओमध्ये किली पॉल आणि नीमा पॉल “दिल बोले वाह वाह” या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी भारतीय वेशभूषेत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचा हा हटके परफॉर्मन्स आणि लूक पाहून नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. तसेच या व्हिडीओला अनेक नेटकरी जास्तीत जास्त शेअर करत आहेत. त्यामुळे लाखो यूजर्सचे लक्ष वेधले गेले आहे.

किली पॉलने त्याच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फिकट नारंगी रंगाचा कुर्ता घातलेला आहे तर त्याची बहीण नीमा हिने जांभळ्या रंगाचा लेहंगा चोली घातलेला दिसत आहे. किली पॉलने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फिकट नारंगी रंगाचा कुर्ता घातलेला आहे. तर त्याची बहीण नीमा हिने जांभळ्या रंगाचा लेहंगा चोली घातलेला दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : 

‘द केरला स्टोरी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार यूकेमध्ये

Imran Khan यांच्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती

अर्पिता खानच्या घरामधील दागिने चोरीला, कोण आहे हा चोर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss