Saturday, June 3, 2023

Latest Posts

भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम राहतोय पाकिस्तानमध्ये, देशाच्या विरोधात रचतोय कट!

भारतामधील मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) आपले नाव बदलले आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भारतामधील मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) आपले नाव बदलले आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. पाकिस्तानी तपास यंत्रणा आयएसआय आणि दाऊद यांच्याकडून देशाच्या विरोधात कट रचला जात आहे अशी माहिती मिळाली आहे. यासाठी दाऊद इब्राहिमने आपली ओळख लपवण्यासाठी नाव बदलले आहे अशी माहिती समोर आली आहे. दाऊद इब्राहिमचे त्याचे खरे नाव इब्राहिम कासकर आहे परंतु त्याने त्याचे नाव बदलून हाजी सलीम अलियास हाजी अली असे ठेवले आहे. दाऊद आपली ओळख लपवून सध्या कराचीमध्ये राहत आहे.

मागील वर्षांमध्ये हाजी सलीमने जवळपास ४० हजार कोटींचे अमली पदार्थ भारतामध्ये पाठवले आहेत. १३ मे गुजरातच्या किनारपट्टीवर एनसीबीनं सुमारे १२ हजार कोटींचे अमली पदार्थ पकडले आणि काही जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातला एक जण अफगाणी होता त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने पुन्हा हाजी सलीम हे नाव सांगितले. भारतामधील वॉन्टेट दहशतवादी, मुंबईचा गुन्हेगार आणि पाकिस्तानाचा नवा ड्रग्ज लॉर्ड दाऊद पाकिस्तानमध्येच आहे. त्याचे अनेक पुरावे स्थानिक माध्यमांमध्ये आले आहेत. आधुनिक दहशतवादामध्ये बॉम्ब हल्ले, सीमेवर घुसखोरी त्याचबरोबर सायबर क्राईम आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा समावेश झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून हाजी सलीम याच नावाखाली पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज तस्करी करण्यात आली आहे. असे सांगण्यात येते की हाजी सलीम हा मूळचा अफगाणिस्तानचा आहे असा दावा आयएसआयने केला आहे. त्यासाठी त्याने काही पुरावेही तयार केले आहेत. उद्योजक म्हणून तो कराचीमध्ये आला आहे. कराचीमधून त्यानं आपला उद्योग सुरु केला आणि तो व्यापारी झाला. परंतु या हाजी सलीमच्या विषयी अजून कोणतीही माहिती नाही. जेव्हा जेव्हा भारतामध्ये पाकिस्तानी बोटींवर कारवाई केली जाते तेव्हा तेव्हा याच हाजी सलीमचं नाव पुढे येत आहे. दाऊद इब्राहिमने १९९३ मध्ये घडवलेल्या स्फोटाच्या जखमा मुंबईकरांच्या मनामध्ये अजूनही ताज्या आहेत.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss