Saturday, June 3, 2023

Latest Posts

PM Narendra Modi यांनी शेअर केला नव्या संसद भवनाचा व्हिडीओ

संसद भवनाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल हा झाला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

उद्या दिनांक २८ मे २०२३ रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. तसेच यासंदर्भात सध्या अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर आधी या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात न आल्याचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणत चर्चेत आला होता. तर नव्या संसद भवनात ठेवण्यात येणाऱ्या ‘सेंगोल’मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. उद्या रविवारी या संसद भवनाचे उद्घाटन हे होणार आहे आणि या उद्घाटनाकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे लागले आहे. तसेच या संसद भवनाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल हा झाला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

 तसेच ही संसदेची नवी इमारत ४ मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे १ हजार आणि राज्यसभेचे जवळपास ४०० खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात १२० कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील. तसेच जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्या व्हिडीओमध्ये संसदेच्या प्रवेशद्वारापासून ते लोकसभा आणि राज्यसभेच्या आतील दृश्यांचा समावेश आहे. संसद भवनावर बसवण्यात आलेला अशोकस्तंभ या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याशिवाय संसदेच्या इमारच्या भव्य प्रवेशद्वारावर लिहिण्यात आलेलं ‘सत्यमेव जयते’ही ठळकपणे समोर येत आहे.

लोकसभेच्या आतील दृश्यांचा या व्हिडीओत समावेश करण्यात आला आहे. तब्बल ८८८ सदस्य बसण्याची क्षमता असणारं हे भव्य सभागृह आहे. आधीच्या लोकसभेतील फक्त हिरव्या रंगाचं कारपेट न ठेवता त्या कारपेटवर नक्षीकाम असल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.लोकसभेप्रमाणेच राज्यसभेचीही रचना हि करण्यात आली आहे. यामध्ये सदस्य बसण्याची क्षमता ३०० इतकी आहे. या सभागृहातही आधीच्या राज्यसभेप्रमाणे फक्त लाल रंगाचं कारपेट न टाकता नक्षीकाम असणारं कारपेट टाकण्यात आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष आणि सभापतींच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यासिवाय आसन व्यवस्थाही सुसज्ज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

तर संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर २० राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये काँग्रेस, TMC,DMK, JDU, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), माकप, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल या मोठ्या पक्षांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

Siddaramaiah सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, २४ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

Nagpur मधील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू, तोकडे कपडे बॅन!

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss