Tuesday, April 30, 2024

Latest Posts

लवकरच संजय राऊत शिवसेना सोडणार, नितेश राणेंचा दावा

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज ठाकरे गटाच्या संदर्भात मोठा दावा केला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप होणार आहे असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज ठाकरे गटाच्या संदर्भात मोठा दावा केला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप होणार आहे असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. लवकरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना सोडणार असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत हे पक्ष सोडणार आहेत आणि ते कोणत्या पक्षात जाणार याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. संजय राऊत शिवसेना का सोडणार आहेत? याची कारणे सुद्धा त्यांनी सांगितली आहेत. नितेश राणेंच्या या दाव्यावरून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांचा हा दावा जर खरा ठरला तर हा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का बसणार आहे.

नितेश राणे यांनी हा दावा पत्रकार परिषद घेऊन केला आहे. नितेश राणे पत्रकार परिषदमध्ये म्हणाले की, येणाऱ्या आठवड्यामध्ये राज्यात भूकंप होणार आहे. १० जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. संजय राऊतांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणी सुद्धा झाली आहे. मला ही माहिती सूत्रांनी दिली आहे असे नितेश राणे म्हणाले. संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिका पाहा. शरद पवारांच्या राजीनामा आणि नंतरची राऊत यांची भूमिका पाहा. त्यातून तुम्हाला सर्व अर्थ लागतील असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत सातत्याने अजित पवारांवर टीका करत आहेत. अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी लगेचच पक्षप्रवेश करतो अशी अट त्यांनी घातली आहे. असे नितेश राणे म्हणाले.

शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला तेव्हा संजय राऊतांना पवारांच्या व्यासपीठावर बसायचे होते. त्यादिवशी संजय राऊत हे सकाळपासून शरद पवारांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु संपर्क होत नव्हता. त्यामुळे संजय राऊत दुपारी ४ वाजता राऊत सिल्व्हर ओकला गेले. राऊत साप आहेत आणि तुम्ही सापाला दूध पाजत होता. तो बाळासाहेबांचा झाला नाही. तो तुमचा होऊ शकणार नाही. हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय, असंही नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss